विशेष लेखः- आयुष्मान कार्डः ई-केवायसी आजच करा
आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजने अंतर्गत मोफत उपचार घेण्यासाठी आयुष्मान कार्ड लाभार्थ्यांकडे असणे गरजेचे आहे. हे कार्ड लाभार्थ्याकडे असल्यास महाराष्ट्रात आणि देशातील इतर राज्यात सुद्धा या योजनेच्या अंगीकृत रुग्णालयात प्रती कुटुंब प्रति वर्ष ५ लाख रुपयांपर्यंतचे मोफत उपचार घेता येतात.
छत्रपती
संभाजीनगर जिल्ह्यात आतापर्यंत २३ लाख २९ हजार ४२४ लाभार्थी या योजनेसाठी पात्र
ठरले आहेत. यात आणखी वाढ होऊ शकते. तथापि, आजपर्यंत ४ लाख ३३ हजार ०४९ आयुष्मान कार्डचे
ई केवायसी पूर्ण झाले आहे. उर्वरित सगळ्यांनी आपले ई केवायसी पूर्ण करुन घ्यावे.
मुळातच आपण या योजनेचे लाभार्थी आहोत का? हे
जाणून घ्यायचे असेल तर खालील वेबलिंक ला भेट द्यावी: https://beneficiary.nha.gov.in/
बेनेफिसिअरी लॉगिन मधून आपण लाभार्थी आहात की नाही हे खालील प्रकारे जाणून घेऊ शकता :
१) तुमच्या
कुटुंबाचे १२ अंकी रेशन कार्ड क्रमांक /Family ID
२) आधार कार्ड
क्रमांक/ ADHAR Card No
३) ठिकाण
(ग्रामीण ) /Location (Rural)
४) ठिकाण
(शहरी )/Location (Urban)
५) पीएमजेएवाय
आयडी (PMJAY ID )
तसेच १२
अंकी शिधापत्रिका (रेशन कार्ड) आयडी
तपासणीसाठी व पडताळणीसाठी आपण https://rcms.mahafood.gov.in/Show_Reports.aspx?RID=116
या वेबलिंकवर जाऊन बघू शकता
आयुष्मान एप्लिकशन
Google play store वरून डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक
करून तुम्ही आयुष्मान एप्लिकशन डाउनलोड करू शकता.
आयुष्मान एप्लिकशन
लिंक : https://play.google.com/store/apps/details?id=com.beneficiaryapp
आयुष्मान
कार्ड ईकेवायसी आयुष्मान ॲप वरून तुम्ही ४ प्रकारे करून घेऊ शकता :
१) आधार कार्ड
ओटीपी
२) फिंगर प्रिंट
३) आयरिस
स्कॅन
४) चेहरा प्रमाणीकरण
पात्र
लाभार्थी आयुष्मान कार्ड- ई केवायसी कोणाकडे करू शकता ?
आपल्या
नागावातील/वॉर्डातील :
१) आशा
स्वयंसेविका,
२) ग्राम पंचायतमधील आपले सरकार सेवा केंद्र चालक
३) कॉमन
सर्विस सेन्टर चालक (CSC VLE)- महा ई सेवा
केंद्र
४) रास्त
धान्य दुकानदार
५) योजनेच्या
अंगीकृत रुग्णालयातील आरोग्य मित्र
तसेच लाभार्थी
स्वतः आयुष्मान अँप डाउनलोड करून तुम्ही बेनेफिसिअरी लॉगिन मधून आपले व आपल्या कुटुंबातील सदस्यांचे आयुष्मान
कार्ड ईकेवायसी करून घेऊ शकता.
जिल्ह्याधिकारी
कार्यालय, छत्रपती संभाजीनगर यांच्या
संकेतस्थळावर
(https://aurangabad.gov.in/आयुष्मान-भारत-प्रधान-मंत/)
या लिंक वर
जाऊन आयुष्मान ॲप्लिकेशन व आधार फेसआरडी हे अँड्रॉइड मोबाइलवर
डाउनलोड करणे, आयुष्मान ॲप चे बेनेफिसिअरी लॉगिन व ऑपरेटर लॉगिन करणे, ,आयुष्मान
कार्ड(ई कार्ड)- eKYC प्रक्रिया व आयुष्मान कार्ड
डाउनलोड करणे यासंबंधित युट्यूब विडिओ वेबलिंक देण्यात आलेल्या आहे.
ज्या
लाभार्थ्यांचे त्यांच्याजवळ सद्यस्थितीत असणारा मोबाइल क्रमांक त्यांच्या आधार
कार्डशी लिंक नसेल त्यांनी ग्राम पंचायतमधील आपले सरकार सेवा केंद्र चालक व कॉमन
सर्विस सेन्टर चालक (CSC VLE)- महा ई सेवा
केंद्राकडे जाऊन आपले आयुष्मान कार्ड(ई कार्ड)- eKYC करून
घ्यावे.
ज्या
लाभार्थ्यांचे रेशन कार्डशी आधार कार्ड सिडींग ऑनलाईन झालेलं नसेल/
किंवा नावात काही दुरुस्ती करायची असेल त्यांनी तहसिल कार्यालयाच्या पुरवठा
विभागामध्ये (ग्रामीण भागातील लाभार्थी ) व अन्न धान्य वितरण विभागामध्ये (म. न.
पा. छत्रपती संभाजीनगर भागातील लाभार्थी) जाऊन ते तात्काळ करून घ्यावेत. यासंबंधी
अधिक माहिती घेण्यासाठी आपण आपल्या स्वस्त धान्य दुकान विक्रेत्यांशी संपर्क करू शकता.
आयुष्मान
भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेची
अधिक माहिती व या योजनेच्या अंगीकृत रुग्णालयांच्या अधिक माहितीसाठी :
1.
AB –PMJAY - वेबलिंक : www.pmjay.gov.in व टोल फ्री
क्रमांक 14555/
1800 111 565
2. MJPJAY
- वेबलिंक : www.jeevandayee.gov.in
व टोल फ्री क्रमांक 155 388/
1800 2332 200
-संकलनः जिल्हा
माहिती कार्यालय, छत्रपती संभाजीनगर.
०००००
Comments
Post a Comment