विकसित भारत संकल्प यात्रेला जिल्हावासीयांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ;११७ ठिकाणी १४ हजार ८१३ लोकांनी विविध योजनांचा घेतला लाभ
छत्रपती संभाजीनगर,दि.८(जिमाका):- केंद्र शासनाच्या विविध योजनांचा लाभ लक्ष्यित लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी व जनजागृती करण्यासाठी विकसित भारत संकल्प यात्रा जिल्ह्यात सुरु आहे. आतापर्यंत (दि.६) या यात्रेने ११७ ठिकाणी हजेरी लावली असून १४ हजार ८१३ लोकांनी या यात्रेच्या अनुषंगाने विविध योजनांचा लाभ घेतला आहे, अशी माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ओमप्रकाश रामावत यांनी दिली आहे.
विकसित भारत संकल्प यात्रा जिल्ह्यात ८५० गावांमध्ये जाणार
आहे. तर शहरात ४७ ठिकाणी यात्रा जाणार आहे. त्यासाठी जागोजागी नियोजनानुसार यात्रा
आयोजित करण्यात येत आहे. जिल्ह्यात इटावा
येथे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या प्रमुख उपस्थितीत यात्रेचे
आयोजन करण्यात आले होते. आतापर्यंत जिल्ह्यात ही यात्रा छत्रपती संभाजीनगर
तालुक्यात १८, फुलंब्री तालुक्यात १५,
कन्नड-१८, वाईजापूर-१९, गंगापूर १२, सिल्लोड १८, पैठण १७ अशा एकूण ११७ गावांत पार
पडली आहे. त्यात विविध योजनांचा लाभ
घेण्यासाठी १४ हजार ८१३ लोकांनी सहभाग नोंदविला. त्यात ८८६८ पुरुष तर ५८६१
महिलांचा समावेश आहे. या यात्रेत प्रामुख्याने सुरक्षा विमा योजना -१५९८, जीवनज्योती
विमा-१२२८, आरोग्य योजना- २८५८ अशा विविध योजनांसाठी लोकांनी लाभ घेतला आहे. या
यात्रेत ड्रोनद्वारे फवारणीचे प्रात्यक्षिक,
अभिनंदन पत्र वितरण, विकसित भारत संकल्प असे विविध उपक्रम घेण्यात येतात.
त्यातही लोकांची मोठ्या संख्येने उपस्थित असते. याशिवाय मेरी कहानी मेरी जुबानी या
अंतर्गत लाभार्थी आपले मनोगत नोंदवित आहेत. त्यातही जिल्ह्यात १६७ लोकांनी आपले
अनुभव नोंदविले आहेत.
जिल्ह्यात विविध ठिकाणी, ग्रामिण भागात, दुर्गम ठिकाणी तसेच
शहरी भागातही लोकांचा यात्रेस प्रतिसाद वाढत असून नागरिकांनी विविध योजनांचा लाभ
घेण्यासाठी यात्रेत सहभागी व्हावे,असे आवाहन करण्यात आले आहे.
०००००




Comments
Post a Comment