डाक अदालत दि.५ जानेवारी रोजी

      छत्रपती संभाजीनगर,दि.२७(जिमाका)- टपाल विभागातील सेवांबद्दल असलेल्या तक्रारींचे निवारण करण्यासंदर्भात शुक्रवार दि.५ जानेवारी २०२४ रोजी  डाक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. औरंगाबाद डाक विभागाच्या सेवांबाबत  तक्रारींचे निवारण सहा आठवड्यांच्या आत झालेले नसेल अशा तक्रारींची दखल या  डाक अदालत मध्ये घेतली जाते. तरी संबंधितांनी आपली डाक सेवेबाबतची तक्रार  प्रवर अधीक्षक डाकघर, औरंगाबाद विभाग, औरंगाबाद -४३१००१ यांच्या नावे दोन प्रतित सोमवर दि.१ जानेवारी २०२४ पर्यंत अथवा त्यापूर्वी पोहोचेल अशा रितीने पाठवावी. नंतर प्राप्त तक्रारींची दखल  घेतली जाणार नाही, असे प्रवर अधीक्षक डाकघर औरंगाबाद विभाग यांनी कळविले आहे.

०००००

Comments

Popular posts from this blog

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा

संघ लोकसेवा आयोगामार्फत दि.14 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय संरक्षण व नौसेना अकादमी परीक्षा –II

कापूस, सोयाबीन, मका हमी भावाने विक्रीः ‘कपास किसान’ व ‘ई- समृद्धी’ॲपवर नोंदणीची सुविधा