संत काशिबा गुरव आणि जगद्ज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ कार्यान्वित
छत्रपती संभाजीनगर,दि.१५(जिमाका):- संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळ आणि जगद्ज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ गुरव व लिंगायत समाजासाठी स्थापना करण्यात आले आहे. या दोन्ही महामंडळाचे कामकाज राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाकडे कार्यान्वित करण्यात आले आहे. योजनांबाबतच्या अधिक माहितीसाठी महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्या. डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, दुसरा मजला, शिवाजी हायस्कुलच्या बाजुला, खोकडपुरा, छत्रपती संभाजीनगर, दुरध्वनी क्रमांक ०२४०-२३४१५४४ या ठिकाणी संपर्क साधावा,असे आवाहन करण्यात आले आहे.
०००००
Comments
Post a Comment