पनवेल मनपा आस्थापना स्पर्धा परीक्षाः पहिल्या दिवशी १६७५ उमेदवारांचा सहभाग
छत्रपती संभाजीनगर,दि.८(जिमाका):- पनवेल महानगरपालिका आस्थापनेवरील गट "अ" ते गट "ड" मधील ४१ संवर्गातील ३७७ पदांकरीता राज्यातील विविध जिल्ह्यातील परीक्षाकेंद्रांवर एकुण ५५,२१४ एवढे उमेदवार परीक्षा देत आहेत. त्यात आज पहिल्या दिवशी तीन सत्रात १६७५ उमेदवारांनी सहभाग घेतला.
पनवेल महानगरपालिका आस्थापनेवरील गट
"अ" ते गट "ड" मधील ४१ संवर्गातील ३७७ पदांकरीता आज दि.८ रोजी
चिकलठाणा एमआयडीसी येथे इ-५०,
सीटीआर मॅन्युफॅक्च्युरींग इंडस्ट्रिज लि. चिकलठाणा एमआयडीसी पोलीस स्टेशन जवळ, ४३१००६.
या परीक्षा केंद्रावर
स.९.०० ते ११.००, दु.१.०० ते ३.००, सा.५.०० ते ७.०० अशा एकूण तीन सत्रांमध्ये
परीक्षा आयोजित करण्यात आली होती. ही परीक्षा टि.सी.एस कंपनीमार्फत घेण्यात येत
आहे.आज पहिल्या दिवशी एकूण १६७५ उमेदवारांनी
सहभाग घेतला. परीक्षा केंद्रावर अधिकारी-
कर्मचारी नियुक्त करण्यात
आले असून अनुचित प्रकार घडू नये व कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये
याकरीता पोलीस कर्मचारीही नियुक्त करण्यात आले होते. परीक्षा केंद्रावर उमेदवारांनी
कोणत्याही इलेक्ट्रॉनिक डिवाईसचा तसेच मोबाईलचा वापर करु नये यासाठी दक्षता घेण्यासाठी
शासनमान्यता प्राप्त मे.ई.सी.आय.एल. (ECIL)
या कंपनीची प्रत्येक
परीक्षा केंद्रावर जॅमर बसविण्यात आले होते. परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी पनवेल महानगरपालिका प्रशासनाने नियुक्त केलेल्या अधिकारी/
कर्मचारी वर्ग, पोलिस प्रशासन यांनी परिश्रम घेतले. कोणत्याही प्रकारचा अनुचित
प्रकार घडला नाही, असे जिल्हासमन्वयक तथा सह आयुक्त नगरपरिषद प्रशासन शाखा
जिल्हाधिकारी कार्यालय, छत्रपती संभाजीनगर यांनी कळविले आहे.
०००००
Comments
Post a Comment