मुद्रांक शुल्क अभय योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

 छत्रपती संभाजीनगर,दि.१३ (जिमाका):-  शासनाने दि. १ डिसेंबर २०२३ ते ३१ मार्च २०२४ या कालावधीत मुद्रांक दंड सवलत अभय योजना सुरु केली आहे. या योजनेचा नागरिकांनी लाभ घ्यावा,असे आवाहन नोंदणी उपमहानिरीक्षक व मुद्रांक उपनियंत्रक विजय भालेराव व सह जिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी विवेक गांगुर्डे यांनी केले आहे.

यासंदर्भात शासनाने दि. ७ डिसेंबर २०२३ रोजी अधिसुचना जारी केली असून त्याद्वारे मुद्रांक दंड सवलत अभ्य योजना दोन टप्प्यात राबविण्यात येणार आहे.

 पहिल्या टप्प्यात दि.१ जानेवारी १९८० ते दि.३१ डिसेंबर २००० या कालावधीतील  नोंदणीकृत / अनोंदणीकृत निष्पादित दस्ताऐवजांसाठी देय असणाऱ्या मुद्रांक शुल्क व त्यावरील दंडाला लागू केली आहे.  हा दंड मुद्रांक शुल्कापैकी  कमी शुल्क भरुन झालेल्या दस्तऐवजांना व वसुलीसस पात्र  मुद्रांकांसाठी आहे. या योजनेचा सवलतीचा कालावधी दि.१ डिसेंबर २०२३ ते दि.३१ मार्च २०२४ असा आहे.

तसेच या योजनेअंतर्गत ज्या  ७/१२ उताऱ्यावर इतर अधिकारांमध्ये मुद्रांक शल्काचे बोजे बसविण्यात आले आहेत. त्यांनी तालुक्याच्या दुय्यम निबंधक नोंदणी कार्यालयाशी अथवा मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालयाशी त्वरीत संपर्क साधावा. पहिल्या टप्प्यात दि.३१ जानेवारी पर्यंत घेऊन भविण्यात होणाऱ्या महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम कलन ४६  वसुली कायद्यानुसार सक्तिची कारवाई टाळण्यासाठी  ही संधी नागरिकांना उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

सवलतीच्या पहिल्या टप्प्यात दि.१ डिसेंबर २०२३ ते दि.३१ जानेवारी २०२४ पर्यंत  (दि.१ जानेवारी १९८० ते दि.३१ डिसेंबर २०००या दरम्यान निष्पादीत केलेल्या संलेख्यांवरील) मुद्रांक शुल्क  एक रुपया ते एक लाख रुपयांपर्यंतच्या रकमेसाठी १०० टक्के माफी  व १ लाखापेक्षा अधिक रकमेसाठी ५० टक्के माफी असेल. तर दुसऱ्या टप्प्यात दि. १ फेब्रुवारी २०२४ ते दि.३१ मार्च २०२४ पर्यंत  एक रुप्यांपासून ते एक लाख रुपयांपर्यंतच्या रकमेसाठी  ८० टक्के माफी तर एक लाख रुपयांपेक्षा अधिक रकमेसाठी ४० टक्के माफी देण्यात येणार आहे.

दुसऱ्या टप्प्यात दि.१ जानेवारी २००१ ते ३१ डिसेंबर २०२० या कालावधीत निष्पादीत केलेले परंतू नोंदणीसाठी दाखल न केलेल्या दस्तबाबत वसुलीस प्रात्र मुद्रांक शुल्क व लागू होणाऱ्या दंडात सवलत लागू करण्यात आली आहे.  ही सवलत सुद्धा दोन टप्प्यात आहे.

 पहिल्या टप्प्यात दि.१ डिसेंबर २०२३ ते दि.३१ जानेवारी २०२४ पर्यंतच्या  कालावधीत दि.१ जानेवारी २००१ ते ३१ डिसेंबर २०२० या दरम्यान निष्पादीत केलेल्या संलेख्यांवरील ) मुद्रांक शुल्क  एक रुपया ते २५ कोटी रुपयांपर्यंतच्या रकमेसाठी २५ टक्के सवलत  आणी २५ कोटी रुपयांपेक्षा अधिक असलेल्या रकमेसाठी २० टक्के सवलत देण्यात येणार आहे. तर दुसऱ्या टप्प्यात  दि.१ फेब्रुवारी २०२४ ते दि.३१ मार्च २०२४ दरम्यान  एक रुपया ते २५ कोटी रुपयांपर्यंतच्या रकमेसाठी २० टक्के सवलत  आणी २५ कोटी रुपयांपेक्षा अधिक असलेल्या रकमेसाठी १० टक्के सवलत देण्यात येणार आहे.

नागरिकांनी दोन्ही टप्प्यांचा अधिकाधिक लाभ घ्यावा,असे आवाहन नोंदणी उपमहानिरीक्षक व मुद्रांक उपनियंत्रक विजय भालेराव व सह जिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी विवेक गांगुर्डे यांनी केले आहे.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा