राष्ट्रीय लोक अदालतः२७७२ प्रकरणांमध्ये तडजोड; ३३ कोटी ५० लक्ष रुपये रकमेची वसुली

 छत्रपती संभाजीनगर,दि.११ (जिमाका):- जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत आयोजित राष्ट्रीय लोकअदालतीत १६१२ प्रलंबित व ११६० दाखलपूर्व अशा एकूण २७७२ प्रकरणांमध्ये तडजोड होऊन एकूण ३३ कोटीक़ ५० लक्ष ७ हजार ३६ रुपयांची वसुली झाली, अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव श्रीमती वैशाली फडणीस यांनी दिली आहे.


राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा व सत्र न्यायालय येथे जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही.पी. इंगळे यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी (दि.९) करण्यात आले. या लोकअदालतीत मोटार अपघात, विद्युत चोरी, धनादेश अनादर प्रकरणे, कौटुंबिक, भूसंपादन व तडजोडयुक्त दिवाणी व फौजदारी प्रकरणे ठेवण्यात आली. तसेच विविध वादपूर्व प्रकरणे ठेवण्यात आली.
या लोकअदालतीत १६१२ प्रलंबित व ११६० दाखलपूर्व असे एकूण २७७२ प्रकरणांमध्ये तडजोड झाली. त्यात प्रलंबित प्रकरणांमध्ये २७ कोटी ८४ लक्ष १४ हजार ३४६ रुपये तर वादपूर्व प्रकरणांमध्ये ४ कोटी ६५ लक्ष ९२ हजार ९९० रुपये अशी एकूण ३३ कोटी ५० लक्ष ७ हजार ३३६ रुपयांची वसुली झाली. या लोकअदालतीत निवाड्यासाठी १५ पॅनेल तयार करण्यात आले होते.
०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा