उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा जिल्हादौरा

             छत्रपती संभाजीनगर, दि.१(जिमाका):-  राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे शनिवार दि.२ डिसेंबर रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत.  त्यांचा दौरा कार्यक्रम याप्रमाणे-

शनिवार दि.२ रोजी सकाळी ९ वा. ५० मि. नी. हेलिकॉप्टरने  पारख मैदान हेलिपॅड, लासूर रोड, गंगापूर येथे आगमन, सकाळी १० वा. साबणे फर्निचर मॉल येथे सदिच्छा भेट, 

सकाळी साडे दहा वा. गजान मल्टि स्पेशालिटी हॉस्पिटल ॲण्ड आयसीयु गंगापूर येथे सदिच्छा भेट,  

सकाळी १० वा. ५५ मि. नी. कविवर्य ना. धों. महानोर साहित्यनगर, श्रीमुक्तानंद महाविद्यालय, गंगापूर जि. छत्रपती संभाजीनगर  ४३ व्या मराठवाडा साहित्य संमेलन गंगापूर उद्घाटन सोहळ्यास उपस्थिती.

दुपारी एक ते सव्वा दोन वा. पर्यंत राखीव.

पावणे तीन वा. तहसिल कार्यालय, गंगापूर येथे आगमन व छत्रपती संभाजीनगर जिल्हास्तरीय आढावा बैठक,

दुपारी सव्वा चार वा. पत्रकार परिषद,

सायंकाळी पावणे पाच वा. हेलिपॅड कडे प्रयाण व हेलिकॉप्टरने  पुणे कडे प्रयाण.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा