जागतिक मानवाधिकार दिवस सर्वांच्या हक्कांचे रक्षण हेच मानवाधिकारांचे संरक्षण- प्रा. संजय गायकवाड

 


छत्रपती संभाजीनगर,दि.८(जिमाका):-   प्रत्येक माणूस जन्मतः स्वतंत्र असून त्याला स्वातंत्र्याचा, जिवंत राहण्याचा आपल्या विकासाची संधी निर्माण करण्याचा हक्क आहे. हा हक्क जोपासत असतांना समाजातील सर्व व्यक्तिंच्या हक्काचे संरक्षण करणे म्हणजे मानवी हक्काचे संरक्षण करणे होय, असे प्रतिपादन प्रा. संजय गायकवाड यांनी आज येथे केले.

मानवी हक्क दिनानिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात ‘मानवी हक्काचे संरक्षण’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. अध्यक्षस्थानी अपर जिल्हाधिकारी डॉ. अरविंद लोखंडे हे होते. तरुंग अधिकारी जयंत नाईक, पोलीस निरीक्षक संदीप गुरमे, नायब तहसिलदार  तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील व पोलीस विभागातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

मानवी हक्काचा जाहीरनामा म्हणजेच मॅग्ना कार्टा स्विकारल्यापासून मानवी हक्कांची चर्चा जगभर झाली. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात झालेल्या जीवितहानीच्या पार्श्वभुमिवर सर्व जगातील देशांच्या संविधानाचा सार म्हणून हा जाहीरनामा स्विकारण्यात आला. त्यात भारतीय संविधातील तरतूदींचा सर्वाधिक समावेश आहे, असे प्रा. गायकवाड यांनी सांगितले.

अपर जिल्हाधिकारी डॉ. लोखंडे म्हणाले की, मानवी हक्कांच्या संरक्षणात सर्वांनी आपला सहभाग द्यावा.  वय वर्षे १८ पूर्ण होणाऱ्या तरुणांनी मतदानासाठी नाव नोंदणी करावी, असे आवाहनही त्यांनी केले.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा