सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनास उद्यापासून प्रारंभ
छत्रपती संभाजीनगर, दि.६(जिमाका):- सशस्त्र सेना ध्वजदिन निधी २०२३ संकलनाचा शुभांरभ शुक्रवार दि.८ रोजी होणार आहे. शुक्रवारी सकाळी ११ वा. मौलाना अबुल कलाम आझाद संशोधन केंद्र, येथील सभागृह येथे हा कार्यक्रम होणार असून जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील. या कार्यक्रमास सर्व वीरपत्नी, वीरमाता, माजी सैनिक, माजी सैनिकांच्या पत्नी व त्यांचे अवलंबित यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर सय्यदा फिरासत यांनी केले आहे.
Comments
Post a Comment