अनोळखी मृतदेहाची ओळख पटविण्याचे आवाहन

 


छत्रपती संभाजीनगर, दि.६ (जिमाका):-   अनोळखी मृतदेहाची ओळख पटविण्याचे आवाहन क्रांती चौक पोलीस स्टेशन मार्फत करण्यात आले आहे. याबाबत पोलीस ठाणे क्रांती चौक यांनी दिलेल्या माहिती नुसार, दि.१९ ऑक्टोंबर २०२३ रोजी सायं ७ वा. सुमारास अनोळखी इसम वय अंदाजे ५५ वर्षे हा इसम डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा रोड, भोईवाडा येथे मयत स्थितीत आढळून आला.  मृतदेहाचे वर्णनः-अंदाजे वय ५० ते ५५ वर्षे, रंग गोरा उंची पाच फूट, दाढी वाढलेली, काळे पांढरे केस, अंगात लाईनगिंचा फिक्कट गुलाबी रंगाचा शर्ट, पँट मळकट काळ्या रंगाची, बांधा सडपातळ. या वर्णनाच्या इसमाबाबत कुणास काही माहिती असल्यास क्रांती चौक पोलीस स्टेशन येथे दुरध्वनी क्रमांक ०२४०-२२४०५५२ व ९५५२५८४०५५ या क्रमांकावर संपर्क करावा, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी आवाहन केले आहे.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा