मनुष्यबळाचे त्रैमासिक विवरण सादर करण्याचे आवाहन

 छत्रपती संभाजीनगर,दि.१२(जिमाका)- सार्वजनिक तसेच खाजगी क्षेत्रातील आस्थापनांनी आपल्याकडील रिक्तपदांची माहिती  सेवायोजन कार्यालयांना  त्रैमासिक विवरणपत्र ई-आर १ या नमुन्यात ३० जानेवारी पर्यंत सादर करावी असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता  मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त एस.आर.वराडे यांनी केले आहे.

 

सार्वजनिक क्षेत्रातील केंद्र व राज्य शासन यांची सर्व कार्यालये, अंगिकृत उद्योग, व्यवसाय, महामंडळे, स्थानिक स्वराज्य संस्था,  जिल्हा परिषद, पंचायत समिती,  महानगर पालिका,नगरपालिका तसेच खाजगी क्षेत्रातील २५ किंवा अधिक लोक काम करतात अशा सर्व आस्थापना, उद्योग, व्यापार, व्यवसाय, कारखाने यांना सेवायोजन कार्यालये(रिक्तपदाची सुचना देणे सक्तिचे) कायदा १९५९ व त्याअंतर्गत नियमावली १९६० नुसार त्रैमासिक विवरण पत्र ईआर १ माहे  डिसेंबर २०२३ तिमाही संपल्यानंतर ३० दिवसांच्या आत (३० जानेवारी २०२४ पर्यंत )सादर करणे बंधनकारक आहे.

माहिती ऑनलाईन सादर करण्याची सुविधा

यासंदर्भात नियोक्त्यांच्या  लॉग ईन मध्ये विवरणपत्र www.rojgar.mahaswayam.gov.in  ही वेबसाईट ओपन करुन  एम्प्लॉयर (लिस्ट अ जॉब) वर क्लिक करुन एम्प्लॉयर लॉग इन मध्ये  नियोक्त्यांचा युजर आयडी व पासवर्ड वापरुन लॉग इन करुन  ई आर रिपोर्ट मधील ई आर १ या ऑप्शनवर क्लिक कउन  ऑनलाईन सादर करावे.

यासंदर्भात काही तांत्रिक अडचणी  आल्यास किंवा अधिकच्या सहाय्यासाठी सोमवार ते शुक्रवार सार्वजनिक सुट्या वगळून  सकाळी १० ते सायं.६ यावेळात (०२४०)२९५४८५९ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. रिक्तपदांची माहिती वेळेवर न दिल्यास संबंधित आस्थापनांवर कारवाई होऊ शकेल असा इशारा सहायक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, छत्रपती संभाजीनगर यांनी केले आहे.

००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा