सैन्यदलात अधिकारी होण्यासाठी परीक्षा पूर्व तयारी प्रशिक्षण

 छत्रपती संभाजीनगर,दि.१२ (जिमाका):-  भारतीय सैन्यदल, नौडल व वायुदलात अधिकारी पदावर भरती होण्यासाठी द्यावयाच्या सीडीएस (Combined Defence Service) परीक्षेची पूर्व तयारी  करण्यासाठी  प्रशिक्षण देण्यात येते. त्यासाठी दि.२ ते १५ फेब्रुवारी दरम्यान  छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे.  या प्रशिक्षणासाठी  निवडण्यात आलेल्या प्रशिक्षणार्थींची निवास, भोजन आणि प्रशिक्षणाची निःशुल्क सोय करण्यात येते. इच्छुक उमेदवारांनी मंगळवार दि.३० रोजी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, छत्रपती संभाजीनगर येथे  मुलाखतीस उपस्थित रहावे. मुलाखतीस येण्यापूर्वी उमेदवारांनी Department Of Sainik Welfare, Pune (DSW) च्या वेबसाईटवर जाऊन  सीडीएस-६२ च्या कोर्ससाठीचे प्रवेशपत्र (किंवा संबंधित जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने दिलेल्या ) घेऊन यावे. या प्रशिक्षणासाठी उमेदवार हा पदवीधर असावा. त्याने केंद्रीय लोकसेवा आयोगाकडे सीडीएस परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज केलेला असावा.

अधिक माहितीसाठी  प्रभारी अधिकारी, छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिकरोड, नाशिक ई-मेलः- training.pctnashik@gmail.com  वर किंवा दूरध्वनी ०२५३-२४५१०३२ किंवा व्हॉट्सॲप ९१५६०७३३०६ वर संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी , छत्रपती संभाजीनगर यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा