रमाई आवास योजना (शहरी) साठी ८६.६० कोटी रुपयांचा निधी वितरीत- श्रीमती जयश्री सोनकवडे
छत्रपती संभाजीनगर, दि.१८(जिमाका):- रमाई आवाज योजना (शहरी) साठी समाज कल्याण विभाग, छत्रपती संभाजीनगर मार्फत सन २०२३ -२४ वर्षासाठी छत्रपती संभाजीनगर विभागासाठी एकूण ८६ कोटी ६० लक्ष रुपयांचा निधी वितरीत करण्यात आला असल्याची माहिती समाज कल्याण विभागाच्या प्रादेशिक उपायुक्त श्रीमती जयश्री सोनकवडे यांनी दिली . यामुळे ३७४४ लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ होईल.
आर्थिक वर्ष २०२३-२४
साठी प्रादेशिक
उपायुक्त, समाज कल्याण विभाग, छत्रपती
संभाजीनगर मार्फत रमाई आवास योजना (शहरी) १९.७७५
कोटी, जालना जिल्ह्यासाठी १० कोटी, बीड
जिल्ह्यासाठी ११.९५
कोटी तर परभणी जिल्ह्यासाठी ४४.८७५ कोटी असा एकूण ८६ कोटी ६० लक्ष रुपयांचा निधी वितरीत
करण्यात आला आहे. त्यातून ३७४४ लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ होईल, अशी माहिती श्रीमती जयश्री सोनकवडे, प्रादेशिक उपायुक्त, समाज
कल्याण विभाग, छत्रपती संभाजीनगर यांनी दिली आहे.
सामाजिक
न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे रमाई आवास योजना राबविण्यात येते. या
योजनेनुसार अनुसूचित जाती व नवबौद्ध कुटुंबातील व्यक्तीसाठी २लाख ३१हजार ५०० रुपये अनुदान
देण्यात येते. कच्चे घर असेल तर पक्के घर बांधण्यासाठी अनुदान देण्यात येते. त्यात
लाभार्थ्याचा स्वतःचा हिस्सा ७.५ टक्के असतो. योजनेतील लाभार्थ्याची निवड हि “सामाजिक
,
आर्थिक आणि जात सर्वेक्षण २०११” नुसार केली जाते. योजनेचा लाभ
कुटुंबातील एकाच व्यक्तीस दिला जातो. लाभार्थ्याच्या नावे स्वतःची जागा/ कच्चे घर
असावे. लाभार्थ्यांनी यापूर्वी कोणत्याही गृहनिर्माण योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
लाभार्थ्यांचे उत्पन्न वार्षिक ३ लाखापर्यंत असावे.
०००००

Comments
Post a Comment