४४ वे वार्षिक पुष्पप्रदर्शन १० व ११ फेब्रुवारी रोजी; सहभागाचे आवाहन
छत्रपती संभाजीनगर,दि.१२ (जिमाका):- सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग उपवने व उद्याने यांच्या वतीने शनिवार दि.१० व रविवार दि.११ फेब्रुवारी रोजी ४४ व्या विभागीय वार्षिक पुष्पप्रदर्शन व उद्यान स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत व प्रदर्शनात अधिकाधिक स्पर्धकांनी सहभाग घ्यावा,असे आवाहन सहायक संचालक जे. व्ही. चौगुले यांनी केले आहे.
या विभागीय वार्षिक पुष्पप्रदर्शनात गुलाबपुष्पे फुलदानातून, मोसमी फुले, बहुवार्षिय
फुले, कॅक्टस व सकुलंट, कुंड्यातील शोभिवंत
झाडे, लॅण्डस्केप ऑन द स्पॉट, कलात्मक पुष्परचना, उद्यान स्पर्धा इ. विभाग आहेत. प्रत्येक
विभागातील विजेत्यास एक चषक, पुष्पप्रदर्शनात सर्वाधिक गुण मिळविणाऱ्या स्पर्धकास उपवने व उद्याने
विभाग छत्रपती संभाजीनगर यांनी पुरस्कृत केलेला फिरता चषक प्रदान करण्यात येईल. या
स्पर्धेतील व सर्व गटांकरता वेगवेगळी परितोषिके ठेवण्यात आली आहेत. तसेच पुष्परचना, पुष्प रांगोळी या विभागासाठीही
पारितोषिके ठेवण्यात आली आहेत.
प्रवेशिका सादर करण्याचे वेळापत्रक याप्रमाणे-
पुष्प प्रदर्शन स्पर्धेसाठी प्रवेशपत्रिका देणे व स्विकारणे दि.२५ जानेवारी
ते ९ फेब्रुवारी पर्यंत कार्यालयीन वेळेत.
उद्यान स्पर्धेसाठी प्रवेशपत्रिका देणे व स्विकारणे दि.२५ जानेवारी
ते ५ फेब्रुवारी पर्यंत कार्यालयीन वेळेत.
उद्यानस्पर्धा हा उद्यानाचा प्रकार, आकार (क्षेत्रफळ) अशा वेगवेगळ्या
गटात असून स्पर्धेत सहभागी झालेल्या उद्यानांचे परीक्षण
दि.६ ते ८ फेब्रुवारी दरम्यान होईल.
प्रवेशिका स्विकारण्याचे ठिकाण- सहाय्यक संचालक, उपवने व उद्याने
यांचे कार्यालय, सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक
विभाग, मध्यवर्ती इमारत (विस्तार), अदालत रोड, छत्रपती संभाजीनगर.
अधिक माहितीसाठी सहायक
संचालक जे. व्ही. चौगुले ८६९८०७०८८२, उद्यान अधीक्षक एस.टी. जाधव ९१७२५५९७९८, एस.टी.
काळे ९४२१३०७५७५ यांच्याशी संपर्क साधावा,असे आवाहन करण्यात आले आहे.
०००००
Comments
Post a Comment