विशेष लेखः- आयुष्मान भारत आणि महात्मा फुले जनआरोग्य योजनाःआपले आरोग्य कवच

  


आपल्या आरोग्याची काळजी घेणे तसेच आपल्या आरोग्यासंदर्भात अकस्मिक उपचार खर्च भागविण्यासाठी राज्य शासनाची महात्मा फुले जनआरोग्य योजना व केंद्र शासनाची आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना योजना सुरु आहे. जनसामान्यांचे आरोग्य कवच असेच या योजनांचे वर्णन करता येईल.

या योजने अंतर्गत मोफत उपचार घेण्यासाठी आयुष्मान कार्ड लाभार्थ्यांकडे असणे गरजेचे आहे. हे कार्ड लाभार्थ्यांकडे असल्यास महाराष्ट्रात आणि देशातील इतर राज्यात सुद्धा या योजनेच्या अंगिकृत रुग्णालयात प्रति कुटुंब प्रति वर्ष ५ लाख रुपयापर्यंतचे मोफत उपचार घेता येतात.

छत्रपती  संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आतापर्यंत २३ लाख २९ हजार ४२४ लाभार्थी या योजनेसाठी पात्र ठरले आहेत. त्यात आणखीन  भर पडणार आहे. आजपर्यंत ५ लाख ४१ हजार ९६७ आयुष्मान कार्ड ई केवायसी पूर्ण झालेले आहेत.

यासंदर्भात नुकतेच (दि.२ रोजी) केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती पवार  यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक झाली. त्यावेळी त्यांनीही आवाहन केले की, या योजनेचा लाभ घेण्यासाठी ग्रामीण व शहरी भागातील आशाताई, कॉमन सर्विस सेंटर (CSC), ग्राम पंचायत मधील आपले सरकार सेवा केंद्र, स्वतः धान्य दुकानदार यांनी जास्तीत जास्त सक्रिय सहभाग घेऊन लाभार्थ्यांना आयुष्मान कार्ड काढून द्यावेत.

आयुष्मान भारत कार्ड ई-केवायसी कसे कराल?

आपण या योजनेचे लाभार्थी आहोत का? हे जाणून घेण्यासाठी वेबलिंक वर भेट द्यावी:  https://beneficiary.nha.gov.in/ 

बेनेफिसिअरी लॉगिन मधून  लाभार्थी आहेत का नाही हे खाली प्रकारे जाणून घेऊ शकता :

१) तुमच्या कुटुंबाचे १२ अंकी राशन कार्ड क्रमांक /Family ID

 २) आधार कार्ड क्रमांक/ ADHAR Card No

३) ठिकाण (ग्रामीण ) /Location (Rural)

४) ठिकाण (शहरी )/Location (Urban)

५) पीएमजेएवाय आयडी/(PMJAY ID ) 

तसेच १२ अंकी शिधापत्रिका (रेशन कार्ड) आयडी तपासणीसाठी व पडताळणीसाठी आपण https://rcms.mahafood.gov.in/Show_Reports.aspx?RID=116 या वेबलिंकवर जाऊन बघू शकता.

त्याचप्रमाणे,

आयुष्मान एप्लिकशन Google store वरून डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही आयुष्मान एप्लिकशन डाउनलोड करू शकता.

आयुष्मान एप्लिकशन लिंक :  https://play.google.com/store/apps/details?id=com.beneficiaryapp

या ॲप वरून तुम्ही ४ प्रकारे  ईकेवायसी करून घेऊ शकता : 

१) आधार कार्ड ओटीपी   

२)  फिंगर प्रिंट

३) आयरिस स्कॅन 

४)  चेहरा प्रमाणीकरण 

पात्र लाभार्थी आयुष्मान कार्ड- ई केवायसी कोणाकडे करू शकता : 

 आपल्या गावातील/वॉर्डातील : 

१) आशा स्वयंसेविका, 

२)  ग्राम पंचायतमधील आपले सरकार सेवा केंद्र चालक 

३) कॉमन सर्विस सेन्टर चालक (CSC VLE)- महा ई सेवा केंद्र 

४) रास्त धान्य दुकानदार 

५) योजनेच्या अंगीकृत रुग्णालयातील आरोग्य मित्र 

 याशिवाय आपण स्वतः आयुष्मान ॲप डाउनलोड करून तुम्ही बेनेफिसिअरी लॉगिन मधून  आपले व आपल्या कुटुंबातील सदस्यांचे आयुष्मान कार्ड ईकेवायसी करून घेऊ शकता.

जिल्ह्याधिकारी कार्यालय, छत्रपती संभाजीनगर यांच्या संकेतस्थळावर  (https://aurangabad.gov.in/आयुष्मान-भारत-प्रधान-मंत/) या लिंक वर जाऊन आयुष्मान ॲप्लिकेशन व आधार फेसआरडी हे अँड्रॉइड मोबाइलवर डाउनलोड करणे, आयुष्मान ॲप चे बेनेफिसिअरी लॉगिन व ऑपरेटर लॉगिन करणे, आयुष्मान कार्ड(ई कार्ड)- eKYC प्रक्रिया व आयुष्मान कार्ड डाउनलोड करणे यासंबंधित युट्यूब विडिओ वेबलिंक देण्यात आलेल्या आहे. 

ज्या लाभार्थ्यांचा सद्यस्थितीतील मोबाइल क्रमांक त्यांच्या आधार कार्डशी लिंक नसेल त्यांनी ग्राम पंचायतमधील ‘आपले सरकार सेवा केंद्र चालक व कॉमन सर्विस सेंटर चालक (CSC VLE)- महा ई सेवा केंद्र कडे जाऊन आपले आयुष्मान कार्ड(ई कार्ड)- eKYC करून घ्यावे.

 ज्या लाभार्थ्यांचे रेशन कार्डशी आधार कार्ड सिडींग ऑनलाईन  झालेलं नसेल/ किंवा नावात काही दुरुस्ती करायची असेल त्यांनी तहसिल कार्यालयाच्या पुरवठा विभागामध्ये (ग्रामीण भागातील लाभार्थी ) व अन्न धान्य वितरण विभागमध्ये (म. न. पा. छ. संभाजीनगर भागातील लाभार्थी ) जाऊन ते तात्काळ करून घ्यावेत. यासंबंधी अधिक माहिती घेण्यासाठी आपण आपल्या रास्त धान्य दुकान विक्रेत्यांशी संपर्क करू शकता. 

००००००

 

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा