कामगार नाट्यस्पर्धेचे आज (दि.१२) पारितोषिक वितरण
छत्रपती संभाजीनगर,दि.११(जिमाका)- महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या विभागीय कार्यालयाच्या वतीने आयोजित ६९ व्या प्राथमिक नाट्यस्पर्धेचे पारितोषिक वितरण शुक्रवार दि.१२ रोजी सायं.साडेपाच वा. ललित कल भवन, उस्मानपुरा येथे होणार आहे,असे सहा. कल्याण आयुक्त भालचंद्र जगदाळे यांनी कळविले आहे. या समारंभास नाट्य कलावंत डॉ. दिलीप घारे अध्यक्षस्थानी उपस्थित राहणार असून एस.टी महामंडळाचे विभाग नियंत्रक सचिन क्षीरसागर, इन्ड्युरन्सचे संजय गाडे, परीक्षक पद्मनाभ पाठक, असलम शेख, श्रीमती योगिता तळेकर आदी उपस्थित राहणार आहेत. या स्पर्धेत १८ नाटकांचे सादरीकरण झाले. अतुल साळवे लिखित बबन राऊत दिग्दर्शित ‘धर्मदंड’, अरुण जऱ्हाड लिखित व दिग्दर्शित ‘ॲनॉमली’, श्याम पेटकर लिखित व प्रदीप भोकरे दिग्दर्शित पुरुष गाळणाऱ्या बायकांचा गाव, संजय राजूरकर लिखित व दिग्दर्शित ‘सिलसिला’ आदी नाटकांचे सादरीकरण झाले.
०००००
Comments
Post a Comment