क्रीडांगण विकास अनुदानासाठी प्रस्ताव मागविले
छत्रपती संभाजीनगर, दि.४ (जिमाका):- जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत क्रीडांगण विकास अनुदान योजनेअंतर्गत सन २०२३-२४ साठी प्रस्ताव मागविण्यात आले असून पात्र संस्थांनी आपले प्रस्ताव दि.२२ पर्यंत पाठवावे असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी बाजीराव देसाई यांनी केले आहे.
क्रीडा व युवक सेवा संचालनालय अंतर्गत जिल्हा क्रीडा कार्यालय जिल्हा
नियोजन मंडळांतर्गत क्रीडांगण विकास अनुदान योजना, व्यायामशाळा विकास अनुदान योजना,
युवक कल्याण विषयक अनुदान योजना राबविली जाते.
व्यायाम शाळा विकास अनुदान व क्रीडांगण विकास अनुदान योजनेसाठी जिल्हा परिषद व नगरपालिका यांच्या शाळा, कनिष्ठ
महाविद्यालय, स्थानिक स्वराज्य संस्था, शासकिय कार्यालये, समाज कल्याण विभाग, आदिवास्क
विकास विभागामार्फत चालविल्या जाणाऱ्या शाळा, ५ वर्षांपेक्षा अधिक काळ अनुदान प्राप्त
संस्था पात्र असतात. तर युवक कल्याण योजनांसाठी सेवाभावी संस्था, युवक मंडळ, व्यायाम
प्रसारक मंडळ पात्र आहेत. प्रस्तावासोबत विहित नमुन्यात भरलेला अर्ज, अनुदान पात्रतेचे
अधिकृत पत्र, संस्थेच्या मालकीची/ दीर्घ मुदतीची कराराने जागा (३० वर्षे), अंदाजपत्रक
आराखडा, नकाशा, लेखा विवरन पत्र, लेखापरिक्षण अहवाल, यापुर्वीचे निधी विनियोग पत्र
सोबत जोडावे. अनुदानासाठीचे परिपुर्ण प्रस्ताव दि.८ ते २२ दरम्यान जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात
दोन प्रतित दाखल करावे. येणारे प्रस्ताव
प्रथम येणाऱ्यास प्राधान्य याप्रमाणे मंजूर केले जाईल,असे जिल्हा क्रीडा अधिकारी बाजीराव
देसाई यांनी कळविले आहे.

Comments
Post a Comment