सार्वजनिक ग्रंथालय, ग्रंथालय कार्यकर्ता, सेवक (ग्रंथमित्र) पुरस्कारासाठी अर्ज मागविले
छत्रपती संभाजीनगर, दि.१८(जिमाका):-महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत ग्रंथालय संचालनालयाकडुन ग्रंथालय चळवळीला प्रोत्साहन देण्यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार तसेच ग्रंथालय चळवळीतील कार्यकर्ते व सेवक यांना भारतीय ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ.शियाली रामामृत रंगनाथन यांच्या नावाने डॉ.एस.आर.रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व सेवक (ग्रंथमित्र) पुरस्कार देण्यात येतो. त्यासाठी इच्छुक व पात्र संस्था व व्यक्तिंकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.
राज्यातील शासनमान्य
सार्वजनिक ग्रंथालयांचा गुणात्मक
विकास व्हावा,ग्रंथालयांकडुन जनतेला
अधिक चांगल्या ग्रंथालय सेवा
उपलब्ध करुन दयाव्यात,वाचन
संस्कृती वृध्दींगत करण्यासाठी प्रोत्साहन
मिळावे या उददेशाने
डॉ.बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार
व डॉ.एस.आर.रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व सेवक (ग्रंथमित्र) पुरस्कार
दिले जातात. त्यासाठी राज्यातील शहरी व ग्रामीण विभागातील ‘अ’, ‘ब’, ‘क’, "ब" "क" "ड" वर्गातील उत्कृष्ट शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांना अनुक्रमे एक लाख रुपये, ७५ हजार रुपये, ५० हजार
रुपये व २५ हजार रुपये रोख रक्कम व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येते. तसेच राज्यातील एक राज्यस्तरीय उत्कृष्ट कार्यकर्ता व एक राज्यस्तरीय उत्कृष्ट ग्रंथालय सेवक यांना प्रत्येकी ५० हजार
रुपये रोख
आणि प्रमाणपत्र तसेच राज्यातील प्रत्येक महसुली विभागातील प्रत्येकी एक उत्कृष्ट कार्यकर्ता व उत्कृष्ट सेवक यांना प्रत्येकी २५ हजार
रुपये रोख रक्कम आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येते. इच्छुक असणारी ग्रंथालये, कार्यकर्ते व सेवक यांनी आपले विहित नमुन्यातील अर्ज दि.२२
जानेवारी ते ९ फेब्रुवारी या कालावधीत
तीन प्रतीत आपल्या जिल्ह्यातील जिल्हा ग्रंथालय अधिकारी यांच्या
कार्यालयात
सादर करावेत,असे आवाहन ग्रंथालय संचालक अशोक मा.गाडेकर यांनी केले आहे.
०००००

Comments
Post a Comment