बांधकाम कामगारांना इस्त्राईल मध्ये नोकरीची संधी

 छत्रपती संभाजीनगर,दि.१२(जिमाका)- इस्राईलमध्ये नोकरीच्या संधींसाठी कुशल बांधकाम कामगारांकडून अर्ज मागविण्याची कार्यवाही कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागाकडून सुरू झाली आहे. इस्राईलमधील बांधकाम क्षेत्रात सुरक्षित वातावरणात आणि चांगल्या वातावरणात  काम मिळावे यासाठी शासन सर्वोतोपरी प्रयत्न करणार  अशी माहिती कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली.                    

                    मंत्री श्री.लोढा म्हणाले की,भारत सरकारच्या नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (NSDC) इंटरनॅशनल आणि महाराष्ट्र सरकारच्या सहकार्याने बांधकाम कामगारांसाठी इस्राईलमध्ये काम करण्याची संधी  मिळत आहे. शासनाकडून सर्वोतोपरी या बांधकाम कामगारांना मार्गदर्शन केले जाणार आहे. जिल्हा स्तरावर जिल्हा कौशल्य,रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मालजीपुरा, स्टेशन रोड, छत्रपती संभाजीनगर येथे दि. १९/०१/२०२४ रोजीपर्यंत इच्छुकांनी संपर्क साधावा.                                  

                   फ्रेमवर्क/ शटरिंग कारपेंटर, बार बेंडिंग मेसन, सिरेमिक टाइलिंग मेसन, प्लास्टरिंग मेसन इत्यादी विविध ट्रेडसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. निवडलेल्या व्यक्तीना इस्राईलमधील इमारत बांधकाम क्षेत्रात सुरक्षित  वातावरणात आणि चांगल्या वातावरणात  काम मिळावे यासाठी शासन सर्वोतोपरी प्रयत्न करणार आहे. या नोकरीमुळे प्रत्येक कामगाराला १.४ लाख रुपयांपासून ते लाखांपर्यंत दरमहा वेतन मिळेल. दरमहा १६००० रुपये अतिरिक्त ठेव निधी ठेवावा लागेल.

             या पदासाठी साठी २१ ते ४५ वर्षे वयोगटातील अर्जदार नोकरीसाठी अर्ज करू शकतात. कामगाराला किमान एक वर्ष ते कमाल पाच वर्षांच्या नोकरीसाठी अनिवार्य करारावर स्वाक्षरी करावी लागेल. तसेच त्यांना कामाचा किमान तीन वर्षांचा अनुभव असावा. त्याचप्रमाणे इस्राईलमध्ये पूर्वीचा रोजगाराचा इतिहास नसावा.अर्जदार किंवा त्यांच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याने यापूर्वी इस्राईलमध्ये काम केलेले नसावे.

 

         अधिक माहितीसाठी आमच्या सोशल मीडिया चॅनेलला भेट द्या आणि सामील व्हा.

        संकेतस्थळ : https://rojgar.mahaswayam.gov.in/#/mic

        संपर्क : 8291662920

        व्हाट्सअप चॅनल : https://whatsapp.com/channel/0029VaFSFjiKmCPXrP0ncr38

        टेलिग्राम ग्रुप : https://t.me/maharashtrainternational

        लिंक्ड इन : https://shorturl.at/hpwQW

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा