भ्रष्टाचार निर्मूलन समितीची विभागीय बैठक दि.२२ रोजी

 छत्रपती संभाजीनगर, दि.१७(जिमाका):- भ्रष्टाचार निर्मूलनासाठी स्थापन करण्यात आलेल्या विभागीय  समितीची बैठक  सोमवार दि.२२ रोजी सकाळी साडेअकरा वा. विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित करण्यात आली आहे. भ्रष्टाचाराचे निर्मूलन करण्यासाठी , प्रशासकीय कार्यपद्धती, नियअम व अन्य व्यवस्थांमध्ये पारदर्शकता व सुलभता आणण्यासाठी  समिती शिफारस करते. जनतेची कामे सहजगत्या व विनासायास होण्याबाबत समिती मार्फत उपाययोजना करण्यात येतात. समिती  सदस्यांना  उपस्थितीचे आवाहन उपायुक्त महसूल तथा सदस्य सचिव विभागीय भ्रष्टाचार निर्मूलन समिती  विभागीय आयुक्त कार्यालय, छत्रपती संभाजीनगर यांनी केले आहे.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा