महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२३: दोन केंद्रांवर ५२८ उमेदवारांची व्यवस्था;२०,२१ व २२ रोजी परीक्षा

 छत्रपती संभाजीनगर, दि.१२ (जिमाका):-  महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत शनिवर दि.२०, रविवर दि.२१ व सोमवार दि.२२ रोजी  राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२३ चे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी छत्रपती संभाजीनगर येथे दोन परीक्षा केंद्रांवर ५२८ उमेदवारांची परीक्षा देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. परीक्षेच्या कामकाजासाठी ७३ अधिकारी कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आली आहे, अशी माहिती  उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे यांनी दिली आहे.

परीक्षा केंद्र याप्रमाणे-

१.      डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेज ऑफ आर्ट्स ॲण्ड कॉमर्स- २४० परीक्षार्थी.

२.      गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ आर्टस ॲण्ड सायन्स, सुभेदारी विश्रामगृहाजवळ, विश्वासनगर.- २८८  

परीक्षार्थींसाठी सुचनाः-

परीक्षार्थींनी परीक्षेस येतांना ओळखीचा पुरावा (स्वतःचे आधार कार्ड, निवडणूक आयोगाचे ओळखपत्र, पासपोर्ट, पॅन कार्ड, स्मार्टकार्ड प्रकारचे ड्रायव्हींग लायसन्स यापैकी कोणतेही एक) परीक्षा कक्षात उमेदवारास प्रवेश प्रमाणपत्र, काळ्या शाईचे बॉलपेन, ओळखपत्र, ओळखपत्राची छायांकीत प्रत या व्यतिरिक्त अन्य कोणतेही साहित्य अथवा वस्तू घेऊन जाण्यास परवानगी नाही. तसेच डिजीटल डायरी, मायक्रोफोन, मोबाईल, ब्लू टूथ, कॅमेरा फोन अन्य तत्सम संदेशवाहक उपकरण, इलेक्र्ट्रॉनिक साहित्य परीक्षा कक्षात नेण्यास मनाई आहे, असेही उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे यांनी कळविले आहे.

०००००                     

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा