इयत्ता 10 वी 12 वी परीक्षा कालावधीत मनाई आदेश
छत्रपती संभाजीनगर, दि.9 (जिमाका):- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत माध्यमिक शालान्त (इ.10 वी) व उच्च माध्यमिक (इ.12 वी) प्रमाणपत्र परीक्षा दि.21 फेब्रुवारी 2024 ते 26 मार्च 2024 या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. या कालावधीत जिल्ह्यातील सर्व परीक्षा केंद्रावरील परीक्षा शांततेच्या वातावरणात पार पडाव्या व कायदा सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी परीक्षा कालावधीमध्ये महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) आणि 37 (3) चे आदेश लागू करण्याचे आदेश अपर जिल्हादंडाधिकारी प्रभोदय मुळे यांनी दिले आहेत. या कालावधीत सार्वजनिक कार्यक्रम, मिरवणूक,सभा यांना परवानगी देण्याचे अधिकार तसेच पाच पेक्षा जास्त जमण्यासाठी सभा, मिरवणुका मोर्चा काढणे, ध्वनीक्षेपक वाजविण्यास परवानगी देण्याचे अधिकार जिल्ह्यातील (ग्रामीण) जिल्हा पोलीस अधीक्षक आणि तसेच पोलीस अधिक्षक छत्रपती संभाजीनगर (ग्रामीण) यांनी प्राधिकृत केलेल्या इतर पोलीस अधिकारी यांना राहतील. या आदेशाचा भंग करणाऱ्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
00000
Comments
Post a Comment