राष्ट्रीय जंतनाशक मोहिमेस मंगळवार (दि.13) पासून प्रारंभ
छत्रपती संभाजीनगर, दि.9 (जिमाका):- वय वर्षे 1 ते 19 या वयोगटातील मुलामुलींमधील कृमी दोष दूर करण्यासाठी जंतनाशक मोहिम आरोग्य विभागातर्फे मंगळवार दि.13 ते 20 फेब्रुवारी या कालावधीत राबविण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर यांनी दिली आहे.
बालकांमध्ये व पौगंडावस्थेतील
मुली-मुलींमध्ये होणारा दीर्घकालीन कृमीदोष हा व्यापक आणि मुलांना कमजोर करणार
आहे. कृमीदोष हा रक्तक्षय आणि कुपोषणाचे कारण तर आहेच तसेच बालकांची बौद्धिक व
शारिरिक वाढ खुंटण्याचेही कारण ठरते. त्याअनुषंगाने केंद्र व राज्य शासनाच्या
मार्गदर्शक सुचनांनूसार मातीतून प्रसार होणाऱ्या कृमीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी
जिल्ह्यात राष्ट्रीय जंतनाशक मोहिम वर्षातुन दोनदा राबविण्यात येते.
राष्ट्रीय जंतनाशक दिनाचा उद्देश
राष्ट्रीय जंतनाशक दिनाचा उद्देश हा
1-19 वर्षे वयोगटातील सर्व मुला-मुलींना शाळा व अंगणवाडी केंद्र स्तरावर जंतनाशक
गोळी व देऊन त्यांचे आरोग्य चांगले ठेवणे, पोषण स्थिती, शिक्षण व जीवनाचा दर्जा
उंचावणे हा आहे.
मोहिमेचा
कालावधी- मंगळवार दि. 13
ते 20 फेब्रुवारी मॉप अप दिन
लाभार्थी-
1
ते 6 वर्ष वयोगटातील सर्व बालके, 1 ली ते 12 वीतील (6 ते 19 वर्ष वयोगटातील) सर्व शाळेत
जाणारे मुले- मुली, 6 ते 19 वर्षे वयोगटातील शाळेत न जाणारे मुले- मुली.
सर्व अंगणवाडी केंद्रावर 1 ते 5 वर्ष
वयोगटातील सर्व बालकांना व 6 ते 19 वर्ष वयोगटातील शाळेत न जाणाऱ्या मुला-मुलींना तसेच
सर्व शासकीय, शासकीय अनुदानित आश्रम शाळा, म्युन्सिपल शाळा व खासगी अनुदानित
शाळांमधून 1 ली ते 12 वीच्या सर्व विद्यार्थ्यांना जंतनाशक गोळी देण्यात येणार
आहे. तसेच काही कारणास्तव ज्या बालकास
जंतनाशक दिनी जंतनाशक गोळी दिली गेली नसेल अशा उर्वरित सर्व बालकांना मंगळवार दि.20
रोजी मॅाप-ॲप दिनी ही गोळी देण्यात येईल. जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागात 2 हजार 618
शाळांमधून व 3 हजार 243 अंगणवाडीमधून 7 लक्ष 79 हजार 88 एवढ्या बालकांन जंतनाशक
गोळ्या देण्यात येणार आहेत. आपल्या मुलांनी मोहिमेच्या दिवशी जंतनाशक गोळीचे सेवन
केले का? याची खात्री पालकांनी करुन द्यावी, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी
डॉ.अभय धानोरकर यांनी केले आहे.
00000
Comments
Post a Comment