पालकमंत्री संदिपान भुमरे यांची संकल्पना हिमरु शाल निर्मितीचे महिलांना मिळ्णार प्रशिक्षण;गुरुवार (दि.८) पासून प्रारंभ
छत्रपती संभाजीनगर, दि.६(जिमाका):- राज्याचे रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री तथा
जिल्ह्याचे पालक मंत्री संदीपान भुमरे यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यातील महिलांना
हिमरु शाल निर्मितीचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालय,
छत्रपती संभाजीनगर व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (एमसीईडी) यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा नियोजन समितीच्या
नाविन्यपूर्ण योजने अंतर्गत हा उपक्रम राबविला जाणार आहे. या उपक्रमास गुरुवार
दि.८ पासुन सुरुवात होत आहे, असे प्रकल्प अधिकारी विनोद तुपे यांनी कळविले आहे.
महाराष्ट्र राज्याच्या आर्थिक विकासात 'महिला उद्योजकता महत्वाचा स्त्रोत
मानली गेली आहे. महिला उद्योजक समाजामध्ये व्यवस्थापन, संघटन व व्यवसायाशी संबंधित
बाबींमध्ये निरनिराळे आयाम प्रस्तुत करीत आहेत.तथापि, महिलांनी परिचालीत केलेल्या
उपक्रमांची संख्या २० टक्के पर्यंत वाढावी या उद्देशाने राज्यातील महिला उद्योजकांसाठी
विशेष धोरण २०१७ राबविले जात आहे. या धोरणाअंतर्गत महिलांचा उद्योजकतेमध्ये मोठा
सहभाग होण्याच्या दृष्टीने महाराष्ट्रातील पहिला जिल्हा म्हणुन छ. संभाजीनगर येथे
विशेष महिलांसाठी विशेष प्रकल्प राबविण्यात येत आहे.
छत्रपती संभाजीनगरची ओळख असणारी हिमरु शाल या लुप्त होत असलेल्या उद्योगास
पुर्नजिवीत ठेवणे हा मुख्य उद्देश आहे. छत्रपती संभाजीनगरच्या सर्व समावेशक
विकासासाठी महिलाचलीत उपक्रमांच्या द्वारे आर्थिक व सामाजिक बदल घडवण्यास
प्रोत्साहन देणारे जागतिकदृष्ट्या सक्षम केंद्र बनविणे व महिला उद्योजकांसाठी पोषक
वातावरण निर्माण करणे, या दृष्टीकोनातून जिल्ह्यात प्रथमतः नाविण्यपुर्ण
योजनेअंतर्गत महिलांना हे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
या अंतर्गत दोन प्रकारचे प्रशिक्षण असून हिमरू
शाल बनविणे तांत्रिक प्रशिक्षण कार्यक्रम १ महिना कालावधीचा असून यात हिमरू शाल
बनविणे बाबत निवड झालेल्या महिलासाठी तांत्रिक प्रशिक्षण देण्यात येणार आहे व
निवासी उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम १८ दिवसीय असुन यात उद्योजकीय
अभ्यासक्रम आहे. त्यात विपनन व
विक्री कौशल्य, ग्राहकांशी सवांद, मार्केटिंग, उद्योगाचे व्यवस्थापन, सिद्धी
प्रेरणा प्रशिक्षण, व्यक्तीमत्त्व विकास असे उद्योजकीय अभ्यासक्रम होणार आहे.
एक दिवसीय उद्योजकीय परिचय मेळाव्याचे वेळापत्रकः-
गुरुवार दि.८
रोजी दु. १२.३० स्थळ ग्रामपंचायत हॉल, बिडकीन, ता. पैठण, जि. छत्रपती संभाजीनगर
(संपर्क
कार्यक्रम आयोजक श्री अमित लोंढे मो. ९६०४३०४६६८ सौ. भारती सोसे, प्रकल्प अधिकारी
मो. क्र. ९४०३६८३१७३)
शनिवार दि.
१०रोजी दु. १२.३० स्थळ चंपा भवन हॉल, विहामांडवा, ता. पैठण, जि. छत्रपती
संभाजीनगर,
(संपर्क
कार्यक्रम आयोजक सौ. नयना गवळी मो. ८३७९००१२६३ सौ प्रतिभा निमकर, जिल्हा प्रकल्प
समन्वयक मो.क्र.९०२८०५६८०० )
सोमवार दि.१२
रोजी दु. १२.३० स्थळ पंचायत समिती हॉल, पैठण, ता. पैठण, जि. छत्रपती संभाजीनगर
(संपर्क
कार्यक्रम आयोजक श्री. गंगावणे मो. ९८२२८२४१२६ व प्रकल्प अधिकारी श्री विनोद तुपे
मो.क्र.९०४९२२८८८८)
शुक्रवार दि.
१६रोजी दु. १२.३० स्थळ :- एमसीईडी, मुख्य कार्यालय, रेल्वेस्टेशन एमआयडीसी,
छत्रपती संभाजीनगर
(संपर्क श्री
विनोद तुपे, प्रकल्प अधिकारी मोक्र. ९०४९२२८८८८)
⠀
या
प्रशिक्षणास जास्तीत जास्त महिलांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन प्रभारी
जिल्हाधिकारी डॉ. अरविंद लोखंडे उद्योजकता विकास केंद्राचे कार्यकारी संचालक
बी.टी. यशवंते यांनी केले आहे.
00000
Comments
Post a Comment