जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण बैठक: कोणत्याही आपत्तीचा मुकाबला करण्यास सदैव सज्ज रहा- जी. श्रीकांत

 



छत्रपती संभाजीनगर, दि.१४(जिमाका):- नुकतेच घडून गेलेली गॅस गळतीची आपत्ती आपल्याला खूप काही शिकवून गेली. आपत्ती कोणतीही असली तरी ती काही सांगून येत नाही. मात्र आपत्ती व्यवस्थापनाचे महत्त्व हेच आहे की, कोणत्याही आपत्तीचा मुकाबला करण्यास आपण सदैव सज्ज असलं पाहिजे, त्यादृष्टीने पूर्वतयारी करावी,असे निर्देश प्रभारी जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी आज दिले.

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक आज जिल्हा नियोजन समिती सभागृहात पार पडली. बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे,  जिल्हा नियोजन अधिकारी भारत वायाळ, मनपाचे अति. आयुक्त रणजित पाटील, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी म्हस्के तसेच सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.

शहरात नुकतेच घडून गेलेल्या टॅंकर अपघातामुळे झालेल्या गॅस गळती या आपत्तीच्या व्यवस्थापन व त्यासंबंधी आलेल्या अडचणी व अनुभवांची बैठकीत चर्चा करण्यात आली. त्याअनुषंगाने लागणारे सहसाहित्य, बचाव पथकातील स्वयंसेवकांसाठी लागणारे सुरक्षा साहित्य खरेदी करुन ठेवावे, असे निर्देश देण्यात आले. उष्मालाट संदर्भात आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिलेल्या खबरदारीच्या उपाययोजनांसंदर्भातही निर्देश देण्यात आले. त्याअनुषंगाने शितकक्ष उभारणे,  दवाखाने, विविध इमारतींचे आग सुरक्षा परीक्षण, उष्माघात बाधितांच्या उपचाराची सुविधा उपलब्ध करणे, वैद्यकीय कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणे, सार्वजनिक ठिकाणी पिण्याच्या पाण्याची पुरेशी उपलब्धता ठेवणे आदी उपाययोजना राबविण्याचे संबंधित विभागांना निर्देश देण्यात आले.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा