पल्स पोलिओ लसीकरण मोहिम : जिल्ह्यातील ३ लाख १४ हजार बालकांना दि.३ मार्च रोजी डोस देण्याची सज्जता

 छत्रपती संभाजीनगर, दि.१६(जिमाका):- पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील  शून्य ते ५ वर्षे वयोगटातील ३ लाख १४ हजार ६५० बालकांना येत्या रविवार दि.३ मार्च रोजी डोस देण्याची सज्जता आरोग्य यंत्रणेने केली आहे. जिल्हा कृती दल समितीच्या दि.१४ रोजी झालेल्या बैठकीत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांनी यासंदर्भात आढावा घेतला.

पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीस जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर, जिल्हा माता व बाल संगोपन अधिकरी डॉ. संजय मुळे,  निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत बढे, डॉ. नागेश आवरगावकर,  डॉ. शेख शकील अहेमद, डॉ. उज्ज्वला भामरे, डॉ. अर्चना राणे,  डॉ. ऒ.आर. राणावत तसेच अन्य संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

पल्स पोलिओ लसीकरण मोहिम रविवार दि.३ मार्च रोजी राबविण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्ह्यातील ९ तालुके व १३०० गावे, वाड्या, वस्त्या, तांडे येथे २२०७ लसीकरण बुथ तयार करण्यात आले आहेत.  १९२१ पथके काम करणार असून त्यावर ४५८ निरीक्षक असतील. १२६ फिरते पथक  असून ८९ बदली पथके असतील. १५३ वैद्ययकिय अधिकारी व जिल्हास्तरीय ९ अधिकारी या लसीकरणासाठी कार्यरत राहणार आहेत,अशी माहिती देण्यात आली.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा