शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास देहदान प्राप्त
छत्रपती संभाजीनगर, दि.१३(जिमाका):- येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास देवराव भिकाजी गोजे यांच्या निधनानंतर त्यांच्या नातेवाईकांनी त्यांच्या देहदानाच्या इच्छेनुसार देह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे शुक्रवारी (दि.९) रोजी सुपूर्द केलेअसे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता दोए. शिवाजी सुक्रे यांनी कळविले आहे.
देवराव भिकाजी गोजे (वय ७८) यांचे
वृद्धापकाळाने निधन झाले,त्यांच्या निधनानंतर त्यांचे पुत्र राजेंद्र देवराव गोजे
आणि विजय देवराव गोजे यांनी त्यांचा मृतदेह या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील
शरीररचनाशास्त्र विभागास शुक्रवारी (दि.९) दान केला. एम.बी.बी.एस. तसेच बी.डी.एस. चे विद्यार्थी तसेच पदव्युत्तर
अभ्यासक्रम करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि संशोधनपर कार्यासाठी या
मृतदेहाचा उपयोग होणार आहे. दिवंगत देवराव गोजे यांच्या कुटुंबियाकडून मृतदेह
प्राप्त झाल्याबद्दल अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांनी त्यांना प्रमाणपत्र दिले.
दिवंगत देवराव गोजे यांच्या मुलांनी
त्यांच्या वडिलांचे देहदान केले. त्यांच्या या कार्यामुळे समाजामध्ये देहदान
करण्याविषयी
जनजागृती होण्यास व वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कार्यास मोलाची मदत होणार
आहे.
शरीररचनाशास्त्र विभागाच्या
प्राध्यापक डॉ.अर्चना कल्याणकार यांनी
गोजे परिवाराचे आभार व्यक्त केले. शरीररचनाशास्त्र विभागाचे डॉ.मोहम्मद लईक,
सहयोगी प्राध्यापक डॉ.शिल्पा शेवाळे, सहायक प्राध्यापक तसेच विभागातील इतर अधिकारी
आणि मृताचे नातेवाईक उपस्थित होते. तसेच विभागातील कर्मचारी मिर्झा युनुस बेग, महाजन,
मार्टीन अस्वले यांचे विशेष सहाकार्य केले, असे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय
अधिष्ठाता डॉ.शिवाजी सुक्रे यांनी कळविले आहे.
०००००
Comments
Post a Comment