महसूल विभागाचा आढावा: उद्दिष्टे वेळेत पूर्ण करण्याचे जिल्हाधिकारी स्वामी यांचे निर्देश

 



छत्रपती संभाजीनगर, दि.२०(जिमाका):- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज महसूल विभागाचा आढावा घेतला. आपल्या जिल्ह्यासाठी दिलेले उद्दिष्ट वेळेत पूर्ण करा, असे निर्देश यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी उपस्थित महसूल अधिकाऱ्यांना दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आज सकाळी महसूल विभागाचा आढावा जिल्हाधिकारी स्वामी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. अपर जिल्हाधिकारी डॉ. अरविंद लोखंडे, निवासी उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे, उपविभागीय अधिकारी व्यंकट राठोड, लतिफ पठाण, उपजिल्हाधिकारी रोहयो अर्चना खेतमाळीस, निलिमा बाफना, डॉ. सुचिता शिंदे तसेच सर्व तहसिलदार आदी उपस्थित होते.

डिजीटल इंडिया भूमि अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रम, महसूल वसुली, गाव तेथे स्मशानभुमि, गौण खनिज महसूल वसुली, लोकशाही दिन प्रलंबित प्रकरणे, माहितीचा अधिकार प्रलंबित प्रकरणे, पुरवठा विभाग, भूसंपादन, न्यायप्रविष्ट प्रकरणे, महात्मा गांधी ग्रामिण रोजगार हमी योजना इ. विविध विषयांचा सखोल आढावा सादर करण्यात आला.  तसेच टंचाई उपाययोजनांबाबतही आढावा घेण्यात आला.

महसूल विभाग हा प्रशासनाचा मुख्य भाग आहे. अनेक प्रकरणे हे अन्य विभागांच्या समन्वयाशी संबंधित असतात त्यामुळे महसूल अधिकाऱ्यांनी सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांशी समन्वय राखून प्रलंबित प्रकरणे मार्गी लावावे. सामान्य नागरिकांना कोणत्याही प्रकारे त्रास होणार नाही याची दक्षता घेऊन कामे करावी. वेळेचे पालन व नियोजन करुन कामे केल्यास प्रलंबितता राहणार नाही,असे श्री. स्वामी यांनी सांगितले.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा