इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे वसतीगृह; विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविले

 छत्रपती संभाजीनगर, दि.२१(जिमाका):- इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत विजाभज, विमाप्र, इमाव प्रवर्गातील इयत्ता १२ वी नंतर उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सन २०२३-२४ करीत शैक्षणिक सत्रासाठी वसतीगृह सुरु करण्यात आलेली आहेत. इच्छुक व पात्र विद्यार्थी विद्यार्थिनींनी आपले अर्ज दि.५ मार्च पर्यंत सादर करावे,असे आवाहन सहायक संचालक इतर मागास बहुजन कल्याण पी.जी.वाबळे यांनी केले आहे. प्रवेश अर्ज इतर मागास बहुजन कल्याण कार्यालय येथे विनामूल्य उपलब्ध आहे.  अर्जासोबत विद्यार्थ्यांनी संबंधित महाविद्यालयाचे बोनाफाईड, आधार कार्ड, बॅंक पासबुक, मागील वर्षाचे गुणपत्रक, दोन फोटो, रहिवासी दाखला इ. आवश्यक कागदपत्रांसह  दि.५ मार्च रोजी पर्यंत सायं.५ वा. पर्यंत सादर करावे, त्यानंतर प्राप्त अर्जांचा स्विकार केला जाणार नाही. अधिक माहितीसाठी सर्व शासकीय वसतीगृह, सहा. संचालक इतर मागास बहुजन कल्याण विभाग, छत्रपती संभाजीनगर  या कार्यालयास संपर्क साधावा.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा