साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ; इच्छुकांकडून कर्ज प्रस्ताव मागविले

 छत्रपती संभाजीनगर, दि.७(जिमाका)- साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या.) जिल्हा कार्यालयास सन २०२३-२४ या आर्थिक वर्षाकरीता जिल्ह्यातील मातंग समाजातील इच्छुक पात्र अर्जदारांनी आपले कर्ज प्रस्ताव ऑनलाईन पद्धतीने  https://beta.slasdc.org या वेबसाईटवर पाठवावे असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक के.बी पवार यांनी  केले आहे.

योजनेचे नावः-

सुविधा कर्ज योजना- भौतिक उद्दिष्ट – ७५, प्रकल्प मर्यादा ५ लक्ष रुपये, आर्थिक उद्दिष्ट ३७५ लक्ष रुपये, योजनेचे नाव- महिला समृद्धी योजना भौतिक उद्दिष्ट - ५०, प्रकल्प मर्यादा १ लक्ष ४० हजार रुपये. आर्थिक उदिष्ट ७० लक्ष रुपये.

अटी व शर्तीः-अर्जदाराचे वय १८ वर्ष पूर्ण व ५० वर्षापेक्षा जास्त नसावे, शहरी व ग्रामीण भागातील अर्जदारांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न मर्यादा ३ लक्ष रुपयांपेक्षा जास्त नसावे. यापूर्वी महामंडळाच्या कुठल्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा.

योजनेत साधारणपणे समाविष्ट लघु व्यवसाय- मोबाईल सर्व्हिसींग, रिपेअरींग, इलेक्ट्रीशियन, इलेक्ट्रॉनिक वस्तु रिपेअरिंग, फ्रिज, एस.सी., टि.व्ही, मायक्रोवेव्ह, लॅपटॉप, कॉम्प्युटर हार्डवेअर, ब्युटी पार्लर, ड्रेस डिझायानिंग, टेलरिंग, फुड प्राडक्टस, प्रोसेसिंग, किराणा दुकान, जनरल, स्टेशनरी स्टोअर्स, मेडीकल स्टोअर्स, फेब्रीकेशन, वेल्डींग, हार्डवेअसर व सेनेटरी शॉप, प्रिटींग, शिवनकला, झेरॉक्स्, लॅमिनेशन, हॉटेल, केटरींग, सर्व्हिसेस, मंडप डेकोरेशन, क्रीडा साहित्य, स्पोर्ट शॉप, फास्टफुड सेंटर, ज्युस सेंटर, कलॉथ, रेडिमेड गारमेंट शॉप, मोटार, मॅकेनिक, रिपअर, शेतीशी निगडीत पुरक, जोडव्यवसाय तसेच वाहन इ.व्यवसायासाठी कर्ज मागणी प्रस्ताव Online सादर करावे.

 ऑनलाईन कर्ज प्रस्तावासोबत अपलोड करावयाची कागदपत्रे

जातीचा दाखला, उत्पन्न प्रमाणपत्र, अर्जदाराचा पासपोर्ट साईज फोटो, रेशन कार्ड (समोरचे पान व शेवटचे पान), आधार कार्ड (समोरील बाजु व पाठीमागील बाजु), पॅन कार्ड, व्यवसायाचे दरपत्रक (कोटेशन),व्यवसाय ज्या ठिकाणी करावायाच आहे त्या ठिकाणाची भाडेपावती, भाडे करारनाम किंवा मालकी हक्काचा पुरावा (नमुना नं-8 लाईट बिल व टॅक्स पावतीसह प्रतिज्ञापत्र बॉन्डवर नोटरी सह), ग्रामपंचायत नगरपालिका, महानगरपालिका यांचे ना हरकत प्रमाणपत्र किंवा शॉपॲक्ट, उद्यम आधार परवाना, व्यवसाया संबधित तांत्रिक प्रमाणपत्र तसेच अनुभवाचा दाखला, शैक्षणिक दाखला, अनुदान किंवा कर्जाचा लाभ न घेतल्याचे स्वंय घोषणापत्र, अर्जदाराचे सिबील क्रेडीट स्कोअर 500 असावा, वाहन खरेदीसाठी ड्रायव्हिंग लायसन्स व आर.टी.ओ. कडील प्रवासी वाहतुक परवाना, प्रकल्प अहवाल.

          या योजनेचे कर्ज प्रस्ताव महामंडळाच्या वेबसाईटवर दिलेल्या सुचनेनुसार दि.१२ फेब्रुवारी ते दि.२० मार्च या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने सादर करावे व सादर केलेल्या अर्जाची व त्यासोबत अपलोड केलेल्या संपुर्ण कागदपत्राची तीन प्रतीत (हार्ड कॉपी) साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ (मर्या.) जि.२२ मार्च पर्यंत कार्यालयीन वेळेत सकाळी पावणे दहा ते सायं. सव्वा सहा वाजेपर्यंत सादर करावी.

          सुविधा कर्ज योजना या योजनेचे कर्ज मागणी स्त्री व पुरुष हे अपलोड करतील, महिला समृद्धी योजनेचे कर्ज मागणी अर्ज फक्त महिला अर्जदार अपलोड करतील. सुविधा कर्ज योजना व महिला समृद्धी योजनेअंतर्गत पात्र झालेल्या लाभार्थीचे कर्ज प्रकरण लाभार्थी निवड समितीच्या मान्यतेने प्रादेशिक कार्यालास मंजुरीसाठी शिफारस करण्यात येईल. सुविधा कर्ज योजना व महिला समृद्धी योजना पैकी अर्जदार एकाच योजनेचा कर्ज प्रस्ताव अपलोड करु शकतील. सुविधा कर्ज योजना व महिला समृद्धी योजना व महिला समृद्धी योजना या दोन योजनेअंतर्गत उद्ष्टिापेक्षा जास्तीचे प्रकरणे प्राप्‍त झाल्यास लाभर्थीचे निवड लॉटरी पद्धतीने केली जाईल. असे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या.) जिल्हा व्यवस्थापक के.बी पवार यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा