‘अमृत’च्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन डॉ. प्रिया देशपांडे यांचा लाभार्थ्यांशी संवाद

 



छत्रपती संभाजीनगर, दि.७(जिमाका)- खुल्या प्रवर्गातील परंतु आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थी आणि  होतकरू तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी 'अमृत'  म्हणजेच महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी, पुणे) या संस्थेची राज्य सरकारने स्थापना केली आहे. या संस्थेच्या विविध योजनांचा लाभ जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांनी घ्यावा, असे आवाहन 'अमृत'च्या प्रबंधक अधिकारी व जिल्हा पालक अधिकारी डॉ.प्रिया देशपांडे यांनी  संवाद मेळाव्या दरम्यान केले.                     

महाराष्ट्रातील खुल्या प्रवर्गातील अर्थिकदृष्टया दुर्बल घटकांच्या आर्थिक उन्नतीसाठी 'अमृत' (महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी, पुणे) या संस्थेची राज्य सरकारने स्थापना केली आहे. 'अमृत'च्या विविध योजनांचा प्रसार, प्रचार करणे व लाभार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी येथे मंगळवारी (दि.६) बैठक घेण्यात आली.   महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी)च्या राज्यसेवा पूर्व आणि मुख्य परीक्षेसाठी निवड झालेल्या उमेवारांना अर्थसहाय्य , संघ लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा पूर्व आणि मुख्य परीक्षेसाठी निवड केलेल्या उमेदवारांना अर्थसहाय्य,अर्थिक विकासाकरिता प्रोत्साहन व प्रशिक्षण कार्यक्रम राबवून स्वावलंबी बनविणे, याच बरोबर कृषी उत्पन्न आधारित लघुउद्योग सुरू करण्यासाठी प्रशिक्षण, कौशल्यविकास प्रशिक्षण व नोकरीची संधी उपलब्ध करून देण्यासाठी समन्वय करून देण्यात येतो. यासाठी अमृतची वेबसाईट www.mahaamrut.org.in या वर सर्व माहिती व अर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहेत. वेबसाईट वरील अमृतच्या योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन केले.यावेळी डॉ. देशपांडे यांनी प्रभारी जिल्हाधिकारी  डॉ.अरविंडे लोखंडे, ग्रामीण तहसीलदार  रमेश मुनलोड यांची सदिच्छा, जालना जिल्हा समन्वयक अक्षय लंबे,अनुराधा पुराणिक, सीमा रामदासी आदींची भेट घेतली.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा