जिल्हाधिकाऱ्यांनी स्विकारला पदभार ; प्रशासन गतिमान, पारदर्शक आणि संवेदनशील करण्यास सर्वोच्च प्राधान्य- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

 






छत्रपती संभाजीनगर, दि.१५(जिमाका):- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज सकाळी आपला पदभार स्विकारला. जिल्ह्याचे प्रशासन गतिमान, पारदर्शक आणि संवेदनशील करण्यास आपले सर्वोच्च प्राधान्य असेल,असा मनोदय जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

 प्रभारी जिल्हाधिकारी म्हणून पदभार सांभाळणारे मनपा आयुक्त जी. श्रीकांत यांच्याकडून श्री. स्वामी यांनी आपला पदभार स्विकारला. जी. श्रीकांत यांनी श्री. स्वामी यांचे स्वागत केले. अपर जिल्हाधिकारी डॉ. अरविंद लोखंडे, निवासी उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे, जिल्हा नियोजन अधिकारी भारत वायाळ, तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी  कर्मचारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी स्वामी यांनी मनोदय व्यक्त केला की, छत्रपती संभाजीनगर जिल्हा हा सांस्कृतिक आणि पर्यटनदृष्ट्या महत्त्वाचा जिल्हा आहे. पर्यटन विकासासाठी अधिक काम करणे. आता प्राथम्याने निवडणूक प्रक्रिया राबविणे, जिल्ह्यातील टंचाई विषयक उपाययोजना करणे या विषयांना प्राधान्य असेल. त्याच बरोबर जिल्ह्याचे प्रशासन हे गतिमान, पारदर्शक आणि संवेदनशील करणे हे उद्दिष्ट असेल. प्रशासना बद्दल जनतेच्या मनात कोणतेही किंतू परंतू राहु नये यासाठी गतिमान, पारदर्शक आणि संवेदनशीलतेने काम करण्यास आपले प्राधान्य असेल.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा