महासंस्कृती महोत्सवःआजपासून सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल

 


छत्रपती संभाजीनगर, दि.२१ (जिमाका):- शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे महासंस्कृती व महानाट्य या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. शिवराज्याभिषेकाच्या ३५० व्या वर्षानिमित्त या कार्यक्रमांचे आयोजन होत आहे. दि.२२ ते २६ पर्यंत विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचा आनंद यानिमित्ताने छत्रपती संभाजीनगरवासियांना घेता येणार आहे.

या महोत्सवाचा उद्घाटन सोहळा गुरुवार दि.२२ रोजी मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर होणार आहे. राज्याचे रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री  तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संदिपान भुमरे यांच्या हस्ते होणार असून  अध्यक्षस्थानी केंद्रीय रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब  पाटील दानवे राहणार असून केंद्रीय अर्थ राज्य मंत्री डॉ. भागवत कराड, अल्पसंख्याक विकास, औकाफ व पणन मंत्री अब्दुल सत्तार, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेता अंबादास दानवे,  लोकसभा सदस्य खा. इम्तियाज जलील,  विधान परिषद सदस्य आ. विक्रम काळे, आ. सतिष चव्हाण, विधान सभा सदस्य आ. हरिभाऊ बागडे, आ.प्रदीप जयस्वाल, आ. संजय शिरसाठ, अ. प्रशांत बंब, आ. उदयसिंग राजपूत, आ. रमेश बोरनारे, विभागीय आयुक्त मधुकरराजे आर्दड,  मनपा आयुक्त जी. श्रीकांत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, पोलीस आयुक्त  मनोज लोहिया आदी मान्यवर उपस्थित राहतील. कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन  जिल्हाधिकारी दिलीप स्वामी  व अपर जिल्हाधिकारी तथा संयोजन समितीचे अध्यक्ष डॉ. अरविंद लोखंडे यांनी केले आहे.

महासंस्कृती महोत्सवात सादर होणारे कार्यक्रम याप्रमाणे-

गुरुवार दि.२२ रोजी

सायं. ६ वा. जयभवानी लोककला बहु. विकास मंडळाचे लोककला  सादरीकरण, कलावंत गणेश उगले.

सायं. साडेसहा वा. शिवदर्शन सांस्कृतिक शाहिरी संच, कलावंत सुरेश होनाजी जाधव यांचे लोककला सादरीकरण.

सायं.७ वा. सुप्रसिद्ध गायक आदर्श शिंदे संगित रजनी. स्थळ-मराठवाडा सांस्कृतिक मंडळाचे मैदान, खडकेश्वर.

तसेच सकाळी १० वाजल्यापासून शिवछत्रपती वस्तू संग्रहालयास शालेय विद्यार्थ्यांची भेट.

शुक्रवार दि.२३ रोजी

सकाळी १० ते १२ महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांचे विविध गुणदर्शन, तसेच अभियांत्रिकी व औषध निर्माणशास्त्र विद्यार्थ्यांचे प्रकल्प प्रदर्शन.

दुपारी १२ वा. आलाप वाद्यवृंद,

दुपारी ३ वा. महिलांचे पारंपारिक खेळ, कलावंत वैजयंती मिसाळ आणि सहकारी,

स्थळ- सिद्धार्थ उद्यान.

सायं. ६ वा. भारुडरत्न निरंजन भाकरे आणि मंडळी यांचे भारुड गायन.

सायं. साडेसहा वा. लोकजागृती बहु. संस्कृ. कला सेवाभावी संस्था कलावंत रामदास धुमाळ यांचे लोककला सादरीकरण.

 

सायं.७ वा. अवधुत गुप्ते संगित रजनी, स्थळ- मराठवाडा सांस्कृतिक मंडळाचे मैदान खडकेश्वर.

शनिवार दि.२४ रोजी

सकाळी १० वा. पारंपारिक क्रीडा प्रकारांचे  प्रदर्शन- स्थळ सिद्धार्थ उद्यान.

सायं. ६ वा. आदर्श लोकसेवा सांस्कृतिक मंडळ, कलावंत श्रीमती उषा सुखदेव खोमणे यांचे लोककला सादरीकरण.

सायं. साडेसहा वा. लोकरंजन लोककला प्रतिष्ठन कलावंत शेषराव पठाडे  यांचे लोककला सादरीकरण.

सायं. ७ वा. महाराष्ट्राची संस्कृती- शाहीर नंदेश उमप- स्थळ मराठवाडा सांस्कृतिक मंडळाचे मैदान, खडकेश्वर.

रविवार दि.२५ रोजी

 सायं ६ वा. बहुउद्देशीय सांस्कृतिक मंडळ, चिकलठाणा, कलावंत श्रीमती मीरा उमप यांचे लोककला सादरीकरण.

सायं. साडेसहा वा. ग्रामसेवा मित्रमंडळ, उंडणगाव ता. सिल्लोड कलावंत रुपेश जयदेव ठाकूर यांचे लोककला सादरीकरण.

सायं. ७ वा. ‘शिवबा’ महानाट्य- स्थळ मराठवाडा सांस्कृतिक मंडळाचे मैदान, खडकेश्वर.

सोमवार दि.२६ रोजी

सायं.६ वा. आभा कलामंच, भावसिंगपूरा, कलावंत मदन मिमरोट

सायं. साडेसहा वा. सांस्कृतिक लोककला शिक्षण संस्था गंगापूर कलावंत जालिंदर नाना केरे यांचे लोककला सादरीकरण.

सायं.७ वा. जल्लोष संस्कृती आणि देशभक्तीचा, स्वरराज लाईव्ह म्युझिक.

हे सर्व कार्यक्रम विनामूल्य असून सगळ्यांना प्रवेश मोफत आहे, असेही अपर जिल्हाधिकारी डॉ.अरविंद लोखंडे यांनी स्पष्ट केले आहे.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा