कौशल्य, व्यवसाय शिक्षण मंडळ संलग्नता मान्यतेसाठी संस्थांकडून अर्ज मागविले

 


छत्रपती संभाजीनगर, दि.१३(जिमाका):- महाराष्ट्र राज्य कौशल्य, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळ मुंबई यांच्या मार्फत विविध कौशल्य विकास अभ्यासक्रम राबविण्यात येतात. सन २०२४-२५ या प्रशिक्षण सत्रापासून  मंडळाचे अभ्यासक्रम राबविण्यासाठी  नवीन संस्थांना व अस्तित्वात असलेल्या संस्थांमध्ये  नवीन अभ्यासक्रम अथवा तुकडी सुरु करण्यासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. तरी इच्छुक व पात्र संस्थांनी मंडळाच्या संकेतस्थळावर दिलेल्या नमुन्यात  संलग्नता मान्यतेसाठी आवश्यक दस्तऐवज व शुल्कासह अर्ज भरुन जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी कार्यालय, भडकल गेट येथे दि.२९ पूर्वी अर्ज सादर करावा,असे जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी यांनी कळविले आहे.

००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा