जिवायो निधी खर्चाचे नियोजन करा- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

 





छत्रपती संभाजीनगर, दि.२० (जिमाका):-जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत प्राप्त निधी खर्च करण्यास निवडणूक आचारसंहिता लागू होण्याची शक्यता लक्षात घेता, अपेक्षित कालावधी कमी मिळेल. त्यामुळे जिल्हा वार्षिक योजनेच्या निधीतून करावयाच्या कामांचे नियोजन करुन निधी वेळेत खर्च करावा,असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज दिले.

जिल्हा वार्षिक योजनेच्या निधीच्या खर्चाचा आढावा आज नियोजन सभागृहात घेण्यात आला. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, निवासी उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे, जिल्हा नियोजन अधिकारी भारत वायाळ, सहायक आयुक्त समाज कल्याण पांडुरंग वाबळे तसेच सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.

जिल्हा नियोजन अधिकारी वायाळ यांनी  जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण, अनुसूचित जाती उपयोजना तसेच आदिवासी उपयोजना अंतर्गत प्राप्त, प्रशासकीय मान्यता प्राप्त व यंत्रणांना वितरीत निधीबाबत माहिती दिली. जिल्हाधिकारी म्हणाले की, निधी खर्चाबाबत प्रक्रिया राबवून निधी शिल्लक रहात असेल तर निधी समायोजनासाठी लवकरात लवकर माहिती पाठवावी. जेणे करुन निधी अन्य विभागांच्या मागणीनुसार वर्ग करता येईल.  निवडणूक आचार संहिता लागू होण्याची शक्यता लक्षात घेता, निधी वेळेत खर्चून कामे दर्जेदार व गुणवत्तापूर्ण करण्याचे नियोजन करा,असे निर्देशही श्री. स्वामी यांनी दिले.

००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा