अंमली पदार्थ विरोधी कार्यकारी समिती बैठक : औषधांच्या दुकानांवर सीसीटीव्ही चित्रण आवश्यक- जी.श्रीकांत

 



छत्रपती संभाजीनगर, दि.१४(जिमाका):- प्रतिबंधित औषधांपैकी काही औषधांचा व्यसनांसाठी वापर होतो असे दिसून आले आहे. हे रोखण्यासाठी औषध विक्रेत्यांच्या दुकानांवर सीसीटीव्ही कॅमेरे आवश्यक असून त्याचे चित्रीकरण अन्न व औषधे प्रशासन विभागाकडे पाठविणे बंधनकारक करावे,असे निर्देश प्रभारी जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी आज दिले.

अंमली पदार्थ विरोधी कार्यकारी समितीची आज जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे, जिल्हा नियोजन अधिकारी भारत वायाळ, मनपाचे अति. आयुक्त रणजित पाटील सर्व संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

नशेसाठी प्रतिबंधित औषधांचा वापर ही चिंताजनक बाब असून त्यांची विक्री ही औषध विक्री दुकानांतू होते असेही निदर्शनास आले आहे. त्यामुळे औषध विक्रेत्यांच्या दुकानावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवून त्याद्वारे चित्रीकरण हे २४X७ करणे अपेक्षित आहे. हे चित्रीकरण वर्षभरातून अन्न व औषध प्रशासन विभागाने स्वतः कडे घ्यावे व तपासावे. असे चित्रीकरण न देणाऱ्या दुकानांचे परवाने रद्द करावे, असे जी. श्रीकांत यांनी सांगितले. तसेच कच्चे- तात्पुरते बांधकामात, अतिक्रमणात, बांधकाम परवानगी नसणाऱ्या मेडीकल दुकानांचे परवानेही रद्द करावे, असेही निर्देश त्यांनी दिले. जिल्ह्यात कुठेही अंमल पदार्थ विक्री, प्रतिबंधित औषधांची विक्री आदी होत असल्याचे निदर्शनास आल्यास ११२ या क्रमांकावर माहिती देता येते, माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवले जाते, अशी माहितीही यावेळी देण्यात आली.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा