किमान कौशल्य विकास कार्यक्रम अंतर्गत मोफत कौशल्य प्रशिक्षण

 


            छत्रपती संभाजीनगर, दि.१७(जिमाका):-  जिल्ह्यातील युवक-युवतींचे कौशल्य विकासाद्वारे सक्षमीकरण करून त्यांना अधिक मागणी असलेल्या क्षेत्रात रोजगार/स्वंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियान अंतर्गत किमान कौशल्य विकास कार्यक्रम सन २०२३-२४ या योजनेंतर्गत पात्रताधारक व इच्छुक असलेल्या युवक-युवतींना मोफत कौशल्य प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या योजनेतंर्गत जिल्ह्यातील रोजगार इच्छूक युवक-युवतींनी मोफत देण्यात येणाऱ्या कौशल्य प्रशिक्षणाचा लाभ घेण्यासाठी नोंदणी अर्ज मागविण्यात आले आहेत.

 

प्रशिक्षण व प्रशिक्षण केंद्र याप्रमाणे-

        शासनाकडून सूचिबध्द प्रशिक्षण संस्थांची प्रशिक्षण केंद्र म्हणून निवड करण्यात आली आहे.

 

१)      आसवा ब्रदर्स कॉर्पोरेट ॲव्हेन्यू, सिडको येथे बिझनेस करस्पॉन्डंट आणि बिझनेस फॅसिलिटेटर (३०४ तास, १२ वी पास), 

२)     आसवा ब्रदर्स स्किल डेव्हलपमेंट सेंटर,सिडको येथे डोमेस्टिक डेटा एंट्री ऑपरेटर (390 तास, १२ वी पास),

३)     सिपेट, एम. आय. डी. सी. चिकलठाणा येथे मशीन ऑपरेटर असिस्टंट इंजेक्शन मोल्डिंग, मशीन ऑपरेटर असिस्टंट प्लास्टिक प्रोसेसिंग (४८० तास, ०८ वी पास),

४)   एकदंत स्कील, कन्नड येथे फिटर फॅब्रिकेशन (५१० तास, १० वी पास), फील्ड टेक्निशियन - एअर कंडिशनर (४०० तास, ०८ वी पास),

५)    शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, सिल्लोड येथे दुचाकी सेवा तंत्रज्ञ (४८० तास, १० वी पास) ऑटोमोटिव्ह वेल्डिंग मशीन ऑपरेटर (मॅन्युअल आणि रोबोटिक्स) (३३० तास, १० वी पास), फिटर फॅब्रिकेशन (५१० तास, १० वी पास) इलेक्ट्रिशियन घरगुती उपाय (३६० तास, ८ वी पास),

६)     शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, छत्रपती संभाजीनगर येथे सीएनसी प्रोग्रामर (४८० तास, डिप्लोमा मेकानिकल), फील्ड टेक्निशियन - एअर कंडिशनर (४०० तास, ८ वी पास), मोबाइल फोन हार्डवेअर दुरुस्ती तंत्रज्ञ (४२० तास, १२ वी पास), प्लंबर (सामान्य) (४१० तास, ०५ वी पास), इलेक्ट्रिशियन घरगुती उपाय (३६० तास, ८ वी पास),

७)    इंडो जर्मन टूल रूम, छत्रपती संभाजीनगर येथे CNC ऑपरेटर टर्निंग (४५० तास, १० वी पास), सीएनसी ऑपरेटर - व्हर्टिकल मशीनिंग सेंटर (४५० तास, १० वी पास) , सीएनसी प्रोग्रामर (४८० तास, डिप्लोमा मेकानिकल), ड्राफ्ट्समन मेकॅनिकल (४५० तास, १० वी पास), सोलर पीव्ही इंस्टॉलर (सूर्यमित्र) (३०० तास, १० वी पास),

८)    करुणा कॉम्पुटर, शिवाजीनगर येथे फील्ड टेक्निशियन इतर घरगुती उपकरणे (४०० तास, ८ वी पास),

९)     महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, सातारा परिसर येथे CNC ऑपरेटर टर्निंग (४५० तास, १० वी पास),

१०) मेटलमन ऑटो प्रायव्हेट लिमिटेड, वाळूज येथे ऑटोमोटिव्ह वेल्डिंग मशीन ऑपरेटर (मॅन्युअल आणि रोबोटिक्स (३३० तास, १० वी पास), ऑटोमोटिव्ह प्रेस शॉप तंत्रज्ञ (४२० तास, १२ वी पास), ऑटोमोटिव्ह असेंब्ली ऑपरेटर (३३० तास, १० वी पास) ऑटोमोटिव्ह टूल रूम टेक्निशियन (४८० तास, १० वी पास), ऑटोमोटिव्ह गुणवत्ता नियंत्रण सहाय्यक (३६० तास, १० वी पास),

११) सह्याद्री टेक्निकल इन्स्टिट्यूट, वाळूज महानगर येथे (हँडहेल्ड उपकरणे (हँडसेट आणि टॅब्लेट) तंत्रज्ञ (४०० तास, १२ वी पास)

१२) साई व्यावसायिक प्रशिक्षण केंद्र, गंगापूर येथे फील्ड टेक्निशियन इतर घरगुती उपकरणे (४०० तास, ८ वी पास),

१३)  सक्षम फाउंडेशन, सिडको येथे डोमेस्टिक डेटा एंट्री ऑपरेटर (३९० तास, १२ वी पास),

१४)                       शिवछत्रपती स्कील, सिल्लोड येथे फील्ड टेक्निशियन इतर घरगुती उपकरणे (४०० तास, ८ वी पास) हँडहेल्ड उपकरणे (हँडसेट आणि टॅब्लेट) तंत्रज्ञ (४०० तास, १२ वी पास),

१५)उज्वलयोग इंडिया ओपीसी प्रा. लि. गंगापूर येथे सीसीटीव्ही इन्स्टॉलेशन टेक्निशियन (४०० तास, ८ वी पास),

१६)  विवेकानंद इन्फोटेक, वैजापूर येथे ग्राफिक डिझायनर (५४० तास, १२ वी पास) या अभ्यासक्रमासाठी जिल्ह्यामध्ये किमान कौशल्य विकास कार्यक्रम सन २०२३-२४ करिता १२०० उमेदवारांना मोफत कौशल्य प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

नोंदणी अशी करावी-

            प्रशिक्षण घेण्याकरीता इच्छुक उमेदवारांनी https://bit.ly/3SD2KUp या लिंकद्वारे ऑनलाईन अर्ज सादर करावे अथवा संबंधित प्रशिक्षण केंद्र / जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मालजीपुरा, स्टेशन रोड, छत्रपती संभाजीनगर- 431001 या कार्यालयाशी प्रत्यक्ष वा 024-2९५४८५९ या दूरध्वनीवर संपर्क साधावा किंवा कार्यालयाच्या aurangabadrojgar@gmail.com ई-मेलवर आपली माहिती सादर करावी असे आवाहन सहायक आयुक्त सुरेश वराडे, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, छत्रपती संभाजीनगर यांनी केले आहे.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा