नोडल अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण :सतर्कतेने कामकाज करावे- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

 





छत्रपती संभाजीनगर, दि.१ (जिमाका):- निवडणूक प्रक्रियेत समाविष्ट प्रत्येक अधिकारी- कर्मचाऱ्यांनी आपल्याकडे सोपविलेल्या कामासंदर्भात निवडणूक आयोगाने दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचा अभ्यास करुन विषय समजावून घ्यावा व सतर्कतेने व सजगतेने सोपविलेले कामकाज करावे,असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज दिले.

जिल्हा नियोजन सभागृहात आज नोडल अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, पोलीस अधीक्षक मनिष कलवानिया, अपर जिल्हाधिकारी डॉ. अरविंद लोखंडे, मनपाचे अति.आयुक्त रणजीत पाटील, उपजिल्हा निवडणूक अधिकारी देवेंद्र कटके, उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे तसेच सर्व नोडल अधिकारी आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी स्वामी म्हणाले की, निवडणूक अधिकाधिक पारदर्शक, निष्पक्ष व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी आचारसंहितेचे काटेकोर अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. त्यासाठी  ही प्रक्रिया राबविणारा अधिकारी वर्ग हा अधिक प्रशिक्षित व अभ्यासपूर्ण असायला हवा. त्यादृष्टीने निवडणूक आयोगाने जारी केलेले नियम व सुचनांचा अभ्यास करुन अधिक सतर्कतेने काम करण्याची गरज आहे.

आचार संहिता निरीक्षण व नियंत्रण पथके, वाहन व्यवस्था, मतदान यंत्रे , स्वीप, माध्यम कक्ष, कायदा व सुव्यवस्था कक्ष, माहिती तंत्रज्ञान कक्ष, खर्च नियंत्रण कक्ष अशा विविध कक्षांच्या पथकांनी आपले सादरीकरण करुन आपल्यामार्फत होणाऱ्या निवडणूक विषयक कामकाजाची माहिती उपस्थितांना दिली.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा