साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाची प्रशिक्षण योजना
छत्रपती संभाजीनगर, दि.१ (जिमाका):- मातंग समाज व तत्सम १२ पोटचातीतील कुटुंबांच्या सामाजिक आर्थिक उन्नतीसाठी त्यांना रोजगार स्वयंरोजगाराची साधने उपलब्ध व्हावीत यासाठी सन २०२४-२५ साठी ४०० जणांच्या प्रशिक्षणाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यासाठी इच्छुक पात्र लाभार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.
पात्रतेचे निकष व अटी खालीलप्रमाणे-
प्रशिक्षणार्थी मातंग समाज व तत्सम १२ पोटजातीतील
असावा. वय १८ ते ५० वर्षांच्या दरम्यान असावे. यापूर्वी महामंडळाच्या कोणत्याही
योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
सोबत जोडावयाची कागदपत्रे- जातीचा दाखला,
शाळा सोडल्याचा दाखला, आधारकार्ड, रेशन कार्ड, दोन पासपोर्ट आकाराचे फोटो, उत्पन्नाचा
दाखला, आधार क्रमांक संलग्नित बॅंक खात्याचा तपशिल इ.
इच्छुक पात्र लाभार्थ्यांनी दि.६ ते २८
मार्च दरम्यान विहित नमुन्यातील अर्ज भरुन परिपूर्ण कागदपत्रांसह आपला अर्ज दाखल
करावा. अर्ज दाखल करण्याचा पत्ताः- डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन,
खोकडपुरा, छत्रपती संभाजीनगर. अर्ज कार्यालयातच विनामूल्य उपलब्ध आहेत,असे जिल्हा
व्यवस्थापक साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ, छत्रपती संभाजीनगर
यांनी कळविले आहे.
०००००

Comments
Post a Comment