उन्हाळ्यात उष्मालाटेपासून बचावाच्या उपाययोजना
छत्रपती संभाजीनगर, दि.४(जिमाका):- उष्मालाटेपासून बचाव करुन जीवित वा वित्तहानी टाळण्यासाठी तसेच उस्ह्माघातापासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी खालील उपाययोजनांचा अवलंब करावा असे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या वतीने कळविण्यात आले आहे.
उपाययोजना खालील प्रमाणे-
१) पुरेसे पाणी प्या, तहान लागली नसली
तरी दर अर्धातासाच्या फरकाने पाणी प्या.
२) घराबाहेर पडतांना डोके झाकण्यासाठी छत्री अथवा टोपीचा वापर करा,
३) दुपारी १२ ते ३ वाजेदरम्यान घराबाहेर
जाणे टाळा.
४) सुर्यप्रकाशापासुन वाचण्यासाठी घरातील
पडदे, झडपांचा वापर करा.
५) उष्णतेच्या लाटेच्या माहितीसाठी
रेडीओ, टीव्ही किंवा वर्तमानपत्रातील माहितीचा वापर करा.
६) हलके, पातळ व सच्छिद्र कपडे वापरा.
७) प्रवासात पाणी सोबत ठेवा.
८) उन्हात काम करीत असल्यास टोपी, छत्री
किंवा ओल्या कपड्याने डोके, मान, चेहरा झाकावा.
९) शरीरातील पाणी व क्षारांचे प्रमाण
कमी होत असल्यास ओआरेस, घरी बनविण्यात आलेली लस्सी, कैरीचे पन्हे, लिंबु पाणी, ताक
इ. चे सेवन करावे.
१०) अशक्तपणा डोकेदुखी सतत येणारा घाम
इ. उन्हाचा झटका बसण्याची चिन्हे ओळखावी व चक्कर येत असल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला
घेण्यात यावा.
११) गुरांना सावलीत ठेवावे व त्यांना
पुरेसे पाणी पिण्यास द्यावे.
१२) घर थंड ठेवण्यासाठी पडदे, शटर व
सनशेडचा वापर करावा. रात्री खिडक्या उघड्या ठेवाव्या.
१३) पंखे, ओले कपडे याचा वापर करावा.
थंड पाण्याने वेळोवेळी स्नान करावे.
१४)
कामाच्या
ठिकाणी जवळच थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी.
१५)सुर्यप्रकाशाचा थेट संबंध टाळण्यासाठी कामगारांना सुचित करावे.
१६) पहाटेच्या वेळी कामाचा निपटारा करावा.
बाहेर काम करीत असल्यास अधून मधून विश्रांती घ्यावी.
१७)
गरोदर
स्त्रिया व आजारी कामगारांची अधिक काळजी घ्यावी.
१८)राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या
@SDMAMaharashtra या ट्विटर, फेसबुक व कू ॲपवरील
सुचना पहाव्या.
१९) जिल्ह्याच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध
करण्यात येणाऱ्या सुचना पहाव्या.
२०) अतिकष्टाची कामे करु नका.
२१) दारु चहा, कॉफी आणि कार्बोनेटेड
थंड पेये घेऊ नका.
२२)उच्च प्रथिनेयुक्त व शिळे अन्न खाऊ
नका.
२३)लहान मुले आणि पाळीव प्राण्यांना
बंद असलेल्या व पार्क केलेल्या वाहनात ठेऊ नका.
२४)
गडद
व घट्ट कपडे घालणे टाळा.
२५)
उन्हाच्या
कालावधीत स्वयंपाक करणे टाळा, स्वयंपाक घरात हवा खेळती राहिल याची व्यवस्था करा.
०००००
Comments
Post a Comment