हिमरु शाल निर्मिती प्रशिक्षणाचे उद्घाटन
छत्रपती संभाजीनगर, दि.१४(जिमाका):- जिल्हा नियोजन समितीच्या नाविन्यपूर्ण योजनेतून हिमरु शाल निर्मितीचे महिलांसाठी प्रशिक्षण देण्याचा कार्यक्रम महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राच्या माध्यमातून राबविण्यात येत आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा नियोजन अधिकारी भारत वायाळ यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यकारी संचालक तथा उद्योग सहसंचालक बी.टी. यशवंते, विभागीय अधिकारी डी.यु. थावरे, एमसीईडी, प्रकल्प अधिकारी भारती सोसे, विनोद तुपे, प्रतिभा निमकर आदी यावेळी उपस्थित होते. निवासी व तांत्रिक उद्योजकता विकास प्रशिक्षण महिलांनी लाभ घ्यावा. छत्रपती संभाजीनगरची ओळख असलेल्या हिमरू शालला पुनर्जीवित करण्याच्या उद्देशाने प्रशिक्षित होवून यशस्वी उद्योजक व्हावे. त्यासाठी शासनाकडून देण्यात आलेले अर्थसहाय सत्कारणी लागेल असे वायाळ यांनी सांगितले. बी.टी.यशवंते यांनी महिलांना कर्ज विषयक योजनांची माहिती दिली. सूत्रसंचालन जिल्हा प्रकल्प समन्वयक प्रतिभा निमकर यांनी तर विनोद तुपे प्रकल्प अधिकारी यांनी आभार प्रदर्शन केले. अमित लोंढे व जुहिता मकवाना यांनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले.
०००००


Comments
Post a Comment