कृषी चिकित्सालय फळरोप वाटीका पैठण येथे दि.१२ रोजी चिकु फळपिकाचा जाहीर लिलाव
छत्रपती संभाजीनगर, दि.५(जिमाका):- कृषी चिकित्सालय फळरोप वाटीका पैठण ता. पैठण येथील प्रक्षेत्रावरील ३९१ चिकू फळपिकाच्या फळधारणा झालेल्या झाडांवरील फळांचा जाहीर लिलावमंगळवार दि.१२ मार्च रोजी दुपारी तीन वाजता आयोजित करण्यात आला आहे. इच्छुक फळ व्यापारी, खरेदीदारांनी उपस्थित रहावे असे आवाहन उपविभागीय कृषी अधिकारी यांनी केले आहे.
लिलावात सहभागी होण्याच्या अटीशर्ती
याप्रमाणे-
१) १८ वर्षे वयाच्या आतील व्यक्तिस लिलावात सहभागी होता येणार नाही.
२) अनामत रक्कम ३० हजार रुपये सकाळी ९ ते दुपारी २ या वेळात उपविभागीय
कृषी कार्यालय, पैठण येथे रोखीने भरावी लागेल.
३) बोली पद्धतीने लिलाव होईल.
एकदा दिलेली बोली परत घेतली जाणार नाही.
४) लिलाव प्रक्रिया वरिष्ठ कार्यालयाचे प्रमुख किंवा त्यांच्या
प्रतिनिधींसमोर होईल.
५) लागवड केलेला प्लॉट सकाळी साडे आठ ते साडे बारा व दुपारी दीड ते
सायं. साडेपाच यावेळात पाहता येईल.
६) लिलाव मंजूरीनंतर लिलाव रक्कम १२ तासांच्या आत भरावी लागेल. रक्कम
जमा न झाल्यास लिलाव धारकाची इच्छा नाही असे समजून दोन नंबरच्या लिलावधारकास लिलाव दिला जाईल. पहिल्या
लिलावधारकाची अनामत रक्कम शासन खाती जमा
होईल.
७) मंजूर लिलावाची पूर्ण रक्कम भरणा न केल्यास फळे तोडणीचे काम करु
दिले जाणार नाही.
८) लिलाव मंजूरी नंतर झालेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे वा प्राण्यांमुळे
नुकसान झाल्यास कार्यालय जबाबदार राहणार नाही.
९) दिलेल्या मुदतीतच फळ तोडणी करणे बंधनकारक आहे. फळे तोडणीनंतर
झाडावर लिलावधारकाचा कोणताही हक्क राहणार नाही.
१०) ज्यांच्या नावे लिलाव मंजूर आहे त्यांनाच फळे तोडण्याचा अधिकार
असेल.
११) लिलाव मंजूर झाल्यानंतर लिलाव भागीदारीत घेता येणार नाही किंवा
भागीदारी परस्पर इतर कोणासही देता येणार नाही.
१२) लिलावधारकाकडे फळ विक्रेता परवाना असणे आवश्यक आहे.
१३) नोंदणीधारक शेतकरी बचत गटाला लिलावात भाग घेता येईल.
१४)
फळे झाडांवरुन उतरवितांना कृषी चिकित्सालय फळरोपवाटीकेच्या
मालमत्तेचे नुकसान झाल्यास प्रचलित दराने नुकसान भरपाई करुन द्यावी लागेल.
१५) फळांची राखणी करण्याची जबाबदारी लिलावधारकाची असेल.
१६) फळे उतरविण्याचे काम कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी व कामकाजाच्या
वेळात करावे लागेल.
१७)
अपेक्षित किंमत न आल्यास
लिलाव मंजूर/ नामंजूर करणे, लिलावात फेरफार कर्णे याचे अधिकारी उपविभागीय कृषी
अधिकारी या कार्यालयाने राखून ठेवले आहेत.
१८) न्यायालयाच्या निर्णयानुसार नैटिक गुन्ह्याखाली शिक्षा झालेले किंवा
ज्यांच्याकडे सरकारचे येणे बाकी आहे त्यांना लिलावात भाग घेता येणार नाही.
१९) सर्व अटी शर्तीचे पालन करणे आवश्यक आहे.
२०)लिलाव मंजूर होईल त्यांनी अटी शर्ती १०० रुपयांच्या मुद्रांकावर
मान्य असल्याचे लेखी स्वरुपातील करारपत्र स्वखर्चाने द्यावे लागेल.
०००००
Comments
Post a Comment