दिव्यांग मतदारांसाठी सर्व सुविधांची सज्जता करा-जिल्हाधिकारी दिलीप स्वामी



छत्रपती संभाजीनगर, दि.७(जिमाका):-
दिव्यांग मतदारांना सुलभ, सहज सहभाग घेऊन मतदानाचा हक्क  बजावता यावा यासाठी निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सर्व सुविधांची सज्जता करा, असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज येथे दिले.

दिव्यांग मतदारांना उपलब्ध करुन द्यावयाच्या सुविधांसंदर्भात जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली  समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात पार पडली. उपजिल्हा निवडणूक अधिकारी देवेंद्र कटके, उपविभागीय अधिकारी व्यंकट राठोड, सहायक आयुक्त समाजल्याण पाडूरंग वाबळे, शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश रामावत यांची उपस्थिती होती. 

देवेंद्र कटके यांनी निवडणूक आयोगाच्या निर्देशांबाबत माहिती दिली की,  अंध मतदारांसाठीचे ब्रेल लिपीतील मार्गदर्शन करणारे तज्ज्ञ, मुकबधीरांसाठी सांकेतिक भाषांमधुन संवाद साधणारे तज्ज्ञ यांच्या सेवा सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.  दिव्यांग मतदाराला मतदान केंद्रापर्यंत मतदानाच्या दिवशी मोफत वाहतूक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मतदान केंद्राच्या ठिकाणी पाळणाघराची सुविधाही उपलब्ध असणार आहे. अंगणवाडी सेविका किंवा नर्स अंगणवाडी कर्मचारी यांच्यामार्फत महिलांच्या लहान मुलांची काळजी घेण्यात येईल. दिव्यांग मतदारांसाठी व्हीलचेअर, स्वच्छतागृह इतर सुविधाही या मतदारांना उपलब्ध करण्यात येणार आहे. याबाबत जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत करण्यात आली असून या समितीचे कार्य दिव्यांग मतदारांचा मतदान प्रक्रियेत  शंभर टक्के सहभाग असावा यासाठी आहे असे श्री.स्वामी यांनी सांगितले.  दिव्यांगांना यासाठी सक्षम या निवडणूक आयोगाने तयार केलेल्या मोबाईल ॲपचाही उपयोग करता येणार आहे. शिवाय १९५० हा हेल्पलाईन नंबरही सुविधेसाठी असेल असेही सांगण्यात आले.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा