नाथषष्ठी यात्रा: सर्व विभागांनी समन्वय राखून यात्रेकरुंना सुविधा द्याव्या- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांचे निर्देश

 



छत्रपती संभाजीनगर, दि.२९(जिमाका):- पैठण येथे होणाऱ्या नाथषष्ठी यात्रोत्सवात सर्व विभागांनी आपापसात समन्वय राखून  यात्रेकरुंना सुविधा उपलब्ध करुन द्याव्या व यात्रा सुखद करावी ,असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज पैठण येथील प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिले.

पैठण येथील यात्रोत्सवाबाबत आज जिल्हाधिकारी स्वामी यांनी दूरदृष्यप्रणालीद्वारे आढावा घेतला. दि.३० रोजी जिल्हाधिकारी स्वतः मुक्कामी जाऊन यात्रास्थळी थांबणार आहेत.  या आढावा बैठकीस जिल्हा मुख्यालयातून जिल्हाधिकारी स्वामी यांच्या समवेत अपर जिल्हाधिकारी डॉ. अरविंद लोखंडे, निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर सहभागी झाले होते. तसेच पैठण येथून उपविभागीय अधिकारी, नगरपालिकेचे मुख्याधिकारी, तहसिलदार, पोलीस विभागाचे अधिकारी, आरोग्य विभागाचे अधिकारी, एस.टी. महामंडळाचे अधिकारी आदी सहभागी झाले होते.

जिल्हाधिकारी स्वामी यांनी सांगितले की, यात्रेकरुंना कोणत्याही प्रकारे अडचण येऊ नये, त्यांचे जाणे येणे हे विनाअडथळा पार पडावे यासाठी वाहतुकीचे मार्ग, पार्किंगची व्यवस्था याबाबत काळजी घेण्यात यावी. तसेच दिंडीच्या वाहनांना जाण्या येण्याचे मार्ग नक्की करावे. यात्रोत्सवापर्यंत पैठणकडे जाणारी अवजड वाहतुक वळवावी. अतिरिक्त पोलीस बंदोबस्त, महिला पोलिसांसह तैनात करावा. तसेच निवडणुक आदर्श आचारसंहितेचा अंमल सुरु आहे, याबाबत विशेष दक्षता घ्यावी. सर्व विभागांनी परस्पर समन्वय राखून यात्रेकरुंना सुविधांची उपलब्धता करुन द्यावी. आरोग्य यंत्रणेने सज्ज रहावे, असे निर्देश जिल्हाधिकारी स्वामी यांनी दिले.

०००००

Comments

Popular posts from this blog

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा

संघ लोकसेवा आयोगामार्फत दि.14 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय संरक्षण व नौसेना अकादमी परीक्षा –II

कापूस, सोयाबीन, मका हमी भावाने विक्रीः ‘कपास किसान’ व ‘ई- समृद्धी’ॲपवर नोंदणीची सुविधा