लोकसभा निवडणूक २०२४: जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला विधानसभा मतदारसंघनिहाय आढावा

 










छत्रपती संभाजीनगर, दि.१२(जिमाका):- लोकसभा निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज विधानसभा मतदारसंघ निहाय पूर्वतयारीचा आढावा घेतला.

जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज विधानसभा मतदारसंघनिहाय निवडणूक पुर्वतयारीचा आढावा घेतला.  अपर जिल्हाधिकारी डॉ. अरविंद लोखंडे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी देवेंद्र कटके, उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे तसेच संबंधित सहा. निवडणूक निर्णय अधिकारी आदी उपस्थित होते.

तसेच स्वीप उपक्रमांबाबत स्मार्ट सिटी कार्यालयात आढावा बैठक घेतली. याबैठकीस उपजिल्हा निवडणूक अधिकारी देवेंद्र कटके, उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे, तसेच मनपा शिक्षण विभागाचे अधिकारी –कर्मचारी, मुख्याध्यापक आदी उपस्थित होते. या बैठकीत मतदारांमध्ये जनजागृती करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले. मतदारांमध्ये जनजागृती करण्यासाठी मोहल्ला कमिटी, स्थानिक धर्मगुरु, सामाजिक संस्था अशांच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचून त्यांना मतदानाचे महत्त्व पटवून द्यावे,असे आवाहन त्यांनी केले.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा