आर्थिक संगमः शनिवारी (दि.९)जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषद

 छत्रपती संभाजीनगर, दि.७(जिमाका):- शासनाच्या उद्योग संचालनालयातर्फे जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषद ‘आर्थिक संगम’ चे आयोजन शनिवार दि.९ रोजी करण्यात आले आहे. या परिषदेचे उद्घाटन राज्याचे रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांच्या हस्ते सकाळी १० वाजता मासिआ सभागृह, पी-२५, एमआयडीसी चिकलठाणा छत्रपती संभाजीनगर येथे होणार आहे. याप्रसंगी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी हे उपस्थित राहणार असून या कार्यक्रमासाठी विकास आयुक्त उद्योग दीपेंद्रसिंह कुशवाह यांचे मार्गदर्शन लाभले आहे.  कार्यक्रमास उपस्थितीचे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक स्वप्निल राठोड व उद्योग सहसंचालक बी.टी. यशवंते यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा