महात्मा बसवेश्वर सामाजिक समता शिवा पुरस्कारासाठी अर्ज मागविले

 छत्रपती संभाजीनगर, दि.५(जिमाका):- वीरशैव लिंगायत समाजाचा सामाजिक, शैक्षणिक आर्थिक विकास होण्यासाठी  कलात्म  समाज्प्रबोधन व साहित्यिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या कलावंत साहित्यिक , समाज प्रबोधनकार आणि समाजसेवकांना , संस्थांना प्रतिवर्षी वैशाख शुद्ध तृतीया (अक्षय तृतीया) या दिवशी महात्मा बसवेश्वर सामाजिक समता शिवा पुरस्कार दिला जातो. इच्छुक संस्था व व्यक्तिंकडून अर्ज मागविण्यात आले आहे. त्यासाठी अर्जाचा नमूना  सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण कार्यालय, खोकडपुरा, छत्रपती संभाजीनगर येथे उपलब्ध आहे. इच्छुकांनी विहित नमुक्न्यातील अर्ज आवश्यक कागद पत्रांसह दि.१५ पर्यंत सादर करावे असे आवाहन सहाय्यक संचालक पी. जी. वाबळे यांनी केले आहे.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा