निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता राखण्यात माध्यमांची भुमिका महत्त्वाची-जिल्हाधिकारी दिलीप स्वामी
छत्रपती संभाजीनगर, दि.७(जिमाका):- निवडणूक प्रक्रियेत मतदान निर्भय व निष्पक्ष वातावरणात होण्यासाठी निवडणूक प्रक्रिया राबविणारी यंत्रणा, राजकीय पक्ष, माध्यमे आणि प्रत्यक्ष मतदार यांच्यात पारदर्शकता राखणे हे अत्यंत महत्त्वाचे असून त्यासाठी माध्यमांची भुमिका महत्त्वाची आहे,असे प्रतिपादन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केले.
जिल्हा निवडणूक शाखेतर्फे आगामी लोकसभा निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने
जिल्ह्यातील माध्यम प्रतिनिधी, जाहिरात संस्था, वृत्तपत्रांचे मालक संपादक, जाहिरात
प्रतिनिधी यांचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. उपजिल्हा निवडणूक अधिकारी देवेंद्र
कटके, जिल्हा माहिती अधिकारी डॉ. मिलिंद दुसाने, प्रशिक्षण नोडल अधिकारी अभिराम डबीर
तसेच माध्यम, जाहिरात प्रतिनिधी आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी स्वामी म्हणाले की, मतदारांसाठी निवडणूक आयोगाने अनेक
प्रकारच्या सुविधा निर्माण केल्या आहेत. या सुविधांबाबत माहिती मतदारांपर्यंत पोहोचविणे,
प्रशासनामार्फत केल्या जाणाऱ्या उपाययोजना पोहोचविणे अशा विविध स्तरावर माध्यमे निवडणूक
यंत्रणेत व मतदारांमध्ये दुवा म्हणून भुमिका बजावत असतात. तसेच मतदानाची टक्केवारी
वाढविण्यासाठीही मतदारांमध्ये जनजागृती करण्यासाठी,
लोकशिक्षण करण्यासाठीही माध्यमांची भुमिका
महत्त्वाची आहे, असे त्यांनी सांगितले.
जिल्हा माहिती अधिकारी डॉ. मिलिंद दुसाने यांनी माध्यम संनियंत्रण
व प्रमाणिकरण समितीचे कार्य, जाहिरात पूर्वप्रमाणिकरण, पेड न्यूज, फेक न्यूज याबाबत
निवडणूक आयोगाचे निर्देश व त्याअनुषंगाने होणारे परिणाम, आचार संहिता पालन आणि प्रचार
याबाबत माहिती सादरीकरणाद्वारे सांगितली.
०००००
Comments
Post a Comment