जिल्हाधिकारी दिलीप स्वामी उद्या (दि.२०) आकाशवाणीवर; लोकसभा निवडणुकीबाबत मतदारांना देणार माहिती
छत्रपती संभाजीनगर, दि.१८(जिमाका):- लोकसभा निवडणूक २०२४ चा कार्यक्रम जाहीर झाला आहे. या निवडणूकीसंदर्भात जिल्ह्यातील मतदारांना अधिक माहिती व्हावी, तसेच मतदारांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी हे बुधवार दि.२० रोजी सकाळी साडेदहा वा. आकाशवाणीवरुन माहिती देणार आहेत.
सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने जिल्ह्यातील
निवडणूक व्यवस्था, मतदार, मतदारांना द्यावयाच्या सुविधा, आदर्श आचारसंहितेचे पालन,
मतदारांमध्ये जागृती करण्यासंदर्भात जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांची मुलाखत आकाशवाणीच्या
छत्रपती संभाजीनगर केंद्रावर ध्वनिमुद्रित करण्यात आली. जिल्हा माहिती अधिकारी डॉ. मिलिंद दुसाने यांनी ही मुलाखत घेतली आहे. आकाशवाणीच्या
छत्रपती संभाजीनगर केंद्र एफएम १०१.७ मेगा हर्टझवरुन बुधावार दि.२० मार्च रोजी
सकाळी साडेदहा वा. प्रसारित होणार आहे. ही मुलाखत airchhatrapatisambhajinagar या ट्यूब
चॅनलवरही ऐकता येणार आहे. जिल्ह्यातील लोकसभा निवडणूकीसंदर्भात सखोल चर्चा या
मुलाखतीत चर्चा करण्यात आली असून जिल्हावासियांनी ही मुलाखत ऐकावी असे आवाहन
करण्यात आले आहे.
०००००
Comments
Post a Comment